अॅडलेड | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया कसोटी मालिकेला आज सुरुवात झाली. कर्णधार विराच कोहलीने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यात दुसऱ्याच षटकात संघाला मोठा झटका बसला आणि केएल राहुल २ धावांवर तंबूत परतला.
कर्णधार विराट कोहली २०१८मध्ये केवळ दुसऱ्यांदा नाणेफेक जिंकला आहे. यापुर्वी जोहान्सबर्ग कसोटीत यावर्षी भारताने परदेशात नाणेफेक जिंकली होती.
विराट कोहलीने आजपर्यंत ४३ पैकी २० सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. या २० पैकी १६ सामन्यात भारताचा विजय झाला आहे तर ३ सामने अनिर्णित राहिले आहेत. यामुळे कर्णधार कोहलीच्या नेतृत्वाखाली नाणेफेक जिंकल्यावर भारतीय संघ कधीही पराभूत झालेला नाही.
गेल्या ६ सामन्यात भारतीय संघ जेव्हा परदेशात नाणेफेक जिंकला आहे त्या सर्व सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–बाॅर्डर- गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या दिवसाची ऐतिहासिक ट्विटरबाजी
–असा आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिकेचा इतिहास
–अंदाज दिग्गजांचे: कोण जिंकणार भारत-आॅस्ट्रेलिया कसोटी मालिका?
–आॅस्ट्रेलियाच्या या वेगवान त्रिकूटापेक्षाही इशांत शर्माने अॅडलेडवर खेळले आहेत सर्वाधिक कसोटी सामने