दिग्गज फलंदाज विराट कोहली (virat kohli) याने भारतीय संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. विराटने सुरुवातीला भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व सोडले. त्यानंतर त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. आता त्यापाठोपाठ विराटने कसोटीचे कर्णधारपद देखील सोडले. यानंतर भारतीय संघाचे माजी वेगवान गोलंदाज अतुल वासन (atul vasan) यांनी विराटच्या कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. विराटने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर याविषयी कसलेच आश्चर्य वाटले नाही, असे वासन म्हणाले आहेत.
अतुल वासन एएनआयला म्हणाले की, “मला यामुळे आजिबात आश्चर्च वाटले नाही. जेव्हा महेंद्रसिंग धोनीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मध्येच कसोटी कर्णधारपद सोडले होते, तेव्हा मला आश्चर्य वाटले होते. मला वाटते मागच्या दोन महिन्यांपासून जे काही होत आहे. टी-२० विश्वचषकात भारतीय संघाच्या खराब प्रदर्शनानंतर त्याच्यावर दबाव वाढला होता. विराट स्वतः धावा करू शकत नव्हता, काही वेळा तो इतरांवर बोट दाखवत होता. एका कर्णधाराच्या रूपात त्याला असे करावे देखील लागते आणि यासाठी मी त्याचे समर्थन करतो. परंतु अगोदर तो पुढे होऊन नेतृत्व करत होता आणि आदर्श ठेवायचा, पण मागच्या काही काळापासून त्याच्या फलंदाजीचा दर्जा घसरला आहे.”
व्हिडिओ पाहा- क्रिकेटर्सलाही मागे सोडत ‘हे’ अंपायर कमावतात चिक्कार पैसा
“प्रत्येक फलंदाज आणि खेळाडू अशा दिवसांमधून जातो. त्याच्यावर तिन्ही प्रकारांमधील कर्णधारपदाचा दबाव देखील होता. विराटने टी-२० कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला, जो योग्य निर्णय होता. पण बोर्डाने त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देखील काढून घेतले. त्याचे लक्ष्य भारतीय संघाला विश्वचषक जिंकवण्याचे होते.” असे वासन पुढे बोलताना म्हणाले.
दरम्यान, मागच्या काही दिवसांमध्ये भारतीय संघात अनेक बदल पाहायला मिळाले. विराटचे कर्णधारपद हा त्यापैकी एक महत्वाचा बदल आहे. टी-२० विश्वचषकानंतर विराटने स्वतःच्या इच्छेने भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर तो एकदिवसीय आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदावर कायम होता. परंतु दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देखील काढून घेतले. रोहित शर्माकडे टी-२० आणि एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली गेली.
आता दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या पराभवानंतर त्याने कसोटी संघाचे कर्णधारपद देखील सोडले. अशात कसोटी संघाच्या कर्णदारपदाची जबाबदारी कोणता खेळाडू स्वीकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महत्वाच्या बातम्या –
अष्टपैलू कामगिरीने तगड्या संघांची ‘शाळा’ घेणारा बी.कॉम टॉपर, सीए, एमबीए असलेला ‘स्कॉलर’ अय्यर
“तर सांग कोणाची विकेट घेऊ”, युजवेंद्र चहलचा विराट कोहलीसाठी स्पेशल मेसेज
व्हिडिओ पाहा –