सेंच्युरीयन | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ६्व्या वनडे सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी करताना अनेक विक्रम केले. याच सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान १७०००धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावे झाला.
हे करताना त्याने एक खास विक्रम केला आहे. तो म्हणजे वनडेत ३५ शतक करण्याचा. विराटने २०८ वनडेत २०० डावात ३५वेळा नाबाद राहत त्याने ५८.१०च्या सरासरीने तब्बल ९५८८ धावा केल्या आहेत. वयाच्या २९ वर्ष आणि १०४ दिवसांचे असताना त्याने ही मोठी कामगिरी केली आहे.
याचकारणामुळे येत्या २६ सामन्यात जरी विराट ० धावांवर बाद झाला तरीही तरीही त्याची सरासरी ५० च्या खाली जावू शकत नाही. विराटची सदध्याची सरासरी ५८.१० ही वनडेतील जगातील सर्वोत्तम आहे.
कमीतकमी ५० वनडे सामने खेळलेल्या खेळाडूंमध्ये विराटची सरासरी सर्वोत्तम आहे.
काल जेव्हा विराटने ३५ वे वनडे शतक केले ते्व्हा त्याने केवळ २०० डाव घेतले तर सचिनने ३०९व्या डावात ही कामगिरी केली आहे. अन्य कोणत्याही खेळाडूला वनडेत ३०च्यावर शतके करता आली नाहीत.






