भारतीय संघातील क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांचा कॉफी विथ करन या शोमधील एपिसोड रविवारी(6 जानेवारी) प्रसारित झाला. या शोमध्ये त्यांनी केलेल्या विवादात्मक विधानांवर मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टिका झाली आहे.
आता भारतीय कर्णधार विराट कोहलीनेही राहुल आणि पंड्या यांची विधाने चुकीची असल्याचे म्हटले आहे. मात्र त्याचबरोबर हे भारतीय क्रिकेट संघाचे विचार नसून ते त्यांचे वैयक्तिक विचार असल्याचे म्हटले आहे.
राहुल आणि पंड्या यांनी महिलांबद्दल या शोमध्ये काही विवादात्मक विधाने केली होती. त्यामुळे त्यांना चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.
विराट म्हणाला, ‘आम्ही भारतीय क्रिकेट संघ म्हणून अशा विचांरांना नक्किच पाठिंबा देत नाही. मी निश्चितपणे सांगू शकतो की भारतीय क्रिकेट संघ आणि एक जबाबदार क्रिकेटपटू म्हणून आम्ही या गोष्टीला सहमती देत नाही. ते सर्व त्यांचे वैयक्तिक मते आहेत.’
‘भारतीय क्रिकेट संघाच्या दृष्टीने त्यांनी केलेल्या विधानांना निश्चितपणे आम्ही पाठिंबा देणार नाही आणि त्या दोन्ही खेळाडूंना त्यांनी केलेल्या चूकीबद्दल जाणीव झाली आहे. ही गोष्ट नक्किच कोणाहीसाठी कठोर असू शकते, त्यांना(राहुल आणि पंड्या) कळाले आहे की ते चूकीचे वागले आहेत.’
याबरोबरच या दोघांवर बीसीसीआयसाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमुन दिलेल्या समीतीचे अध्यक्ष विनोद राय यांनी दोन वनडे सामन्यांची बंदी घालण्यात यावी अशी शिफारस केली आहे. पण सीएओच्या सदस्या डायना एडुलजी यांनी हे प्रकरण बीसीसीआयच्या लीगल सेलकडे पाठवले आहे.
त्याबद्दल विराट म्हणाला, ‘आम्ही अजून त्या निर्णयाची वाट पाहत आहोत. पण भारतीय क्रिकेट संघाच्या दृष्टीने या बदलामुळे संघाच्या विश्वासावर काहिही बदल होणार नाही. चेंजिंग रुममध्ये तयार झालेल्या चांगल्या वातावरणाशी याचा काहीही परिणाम होणार नाही. ते पूर्णपणे वैयक्तिक विचार होते.’
तसेच विराटने 12 जानेवारी पासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी पंड्या ऐवजी जडेजाला संधी मिळू शकते असे सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–पहिल्या वनडे सामन्यात या ११ खेळाडूंना मिळू शकते संधी