वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात आजपासून(30 ऑगस्ट) सबिना पार्क, किंग्स्टन येथे दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल.
या सामन्यासाठी मैदानात पाऊल टाकताच भारताचा कर्णधार विराट कोहलीला भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि सुनील गावस्कर यांच्या एका विक्रमाला मागे टाकण्याची संधी आहे.
हा सामना विराटचा भारताचा कसोटी कर्णधार म्हणून 48 वा सामना असणार आहे.
त्यामुळे तो आज भारताचे कसोटीत सर्वाधिक सामन्यात नेतृत्त्व करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत अझरुद्दीन आणि गावस्कर यांना मागे टाकेल. अझरुद्दीन आणि गावस्कर या दोघांनीही भारताचे प्रत्येकी 47 कसोटी सामन्यात नेतृत्व केले आहे.
त्यामुळे सध्या भारताचे कसोटीत सर्वाधिक सामन्यात नेतृत्त्व करणाच्या यादीत विराट या दोघांसह विभागून तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर धोनी आहे. धोनीने 60 कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर सौरव गांगुली आहे. गांगुलीने 49 कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे.
#भारताचे सर्वाधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करणारे क्रिकेटपटू –
60 – एमएस धोनी
49 – सौरव गांगुली
47 – सुनील गावस्कर
47 – मोहम्मद अझरुद्दीन
47 – विराट कोहली
40 – मन्सूर अली खान पतौडी
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विराट कोहलीकडून ‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या या सर्वात मोठ्या विक्रमाला धोका…
–हा मोठा पराक्रम करण्यापासून इशांत शर्मा केवळ एक विकेट दूर
–डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचने शब्द पाळला, विश्वविजेत्या इंग्लंडला दिली ही खास भेट