---Advertisement---

IPL 2021: ‘रनमशिन’ कोहलीची नजर खास विश्वविक्रमावर, आजपर्यंत कोणालाच नाही जमला नाहीये ‘तो’ पराक्रम

On: सोमवार, एप्रिल 5, 2021 7:09 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला आता आठवड्यापेक्षाही कमी कालवधी राहिला आहे. येत्या ९ एप्रिलपासून आयपीएलच्या या १४ व्या हंगामाला सुरुवात होत आहे. या हंगामासाठी आत सर्व संघांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या हंगामाची सुरुवात गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्याने होईल. तब्बल २ वर्षांनी आयपीएल भारतात होत असल्याने या हंगामाची उत्सुकता सर्वत्र पाहायला मिळत आहे. तसेच हा हंगाम बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीसाठीही खास ठरणार आहे.

विराटला मोठा विक्रम करण्याची संधी

विराट कोहली म्हटलं की विक्रम ही गोष्ट नवीन नाही. विराट जेव्हाही फलंदाजी करतो, तेव्हा बऱ्याचदा काही ना काही विक्रम करतच असतो. आता तो आयपीएलमध्ये एक नवा विश्वविक्रम रचण्यास सज्ज झाला आहे.

विराटने येत्या आयपीएल हंगामात १२२ धावा करताच आयपीएल इतिहासात ६००० धावा पूर्ण करणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरु शकतो. आयपीएलमध्ये अजूनतरी कोणत्याही क्रिकेटपटूला ६००० धावांचा टप्पा पार करता आलेला नाही. सध्यातरी केवळ विराटच हा टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ आहे.

विराटच्या नावावर सध्या आयपीएलमध्ये १९२ सामन्यांत ३८.१६ च्या सरासरीने सर्वाधिक ५८७८ धावा आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराटच्या पाठोपाठ असणारा सुरेश रैना बराच मागे आहे. रैनाने ५३६८ धावा केल्या आहेत. तसेच आत्तापर्यंत विराट आणि रैनाशिवाय डेव्हिड वॉर्नर (५२५४), रोहित शर्मा (५२३०) आणि शिखर धवन (५१९७) यांनाच आयपीएलमध्ये ५००० धावा करण्याचा टप्पा ओलांडता आला आहे.

सर्व १४ हंगामात एकाच संघाकडून खेळतोय विराट

आयपीएलचा पहिला हंगाम २००८ साली खेळवण्यात आला होता. या हंगामात विराटला बेंगलोर संघाने आपल्या गोटात सामील करुन घेतले. तेव्हापासून विराट बेंगलोर संघाकडूनच खेळत आहे. आता तर तो बेंगलोरकडून १४ वा हंगाम खेळण्यासही सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत विराटशिवाय असा कोणताच खेळाडू नाही, जो १४ आयपीएल हंगामात एकाच संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे हा विराट हा विक्रम करणारा पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

शेळीपालन ते शिक्षकाची नोकरी; वयाची तिशी पार केलेल्या भारतीय क्रिकेटपटूचा प्रवास वाचून पाणावतील डोळे

फेक फिल्डिंगने हुकवलं फखर जमानचं द्विशतक, पाकिस्तानी दिग्गजाने क्विंटन डीकॉकला सुनावली खरीखोटी

आयपीएल तोंडावर असताना धोनी ‘फुल्ली लोडेड फॉर्म’मध्ये; पाहा नजर न हटणाऱ्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ची आतिषबाजी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---