आज(14 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु होत आहे. या मालिकेतील पहिला सामना आज वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे खेळण्यात येणार आहे.
या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या एका विश्वविक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.
विराटने जर या सामन्यात शतक केले तर हे त्याचे भारतात केलेले 20 वे वनडे शतक असेल. त्यामुळे तो भारतात सर्वाधिक वनडे शतके करण्याच्या सचिनच्या विक्रमाची बरोबरी करेल.
सचिनने वनडेमध्ये भारतात 164 सामने खेळताना 20 शतके केली आहेत. तर विराटच्या नावावर भारतात खेळताना 92 वनडे सामन्यात 19 शतके आहेत.
भारतात सर्वाधिक वनडे शतके करणारे क्रिकेटपटू –
20 शतके – सचिन तेंडूलकर
19 शतके- विराट कोहली
10 शतके – रोहित शर्मा
8 शतके – एमएस धोनी
7 शतके – एबी डिविलियर्स
7 शतके – युवराज सिंग
भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिका हा संघ जिंकणार, रिकी पाँटिंगची मोठी भविष्यवाणी
वाचा👉https://t.co/UFiPwoHE2U👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsAUS @RickyPonting— Maha Sports (@Maha_Sports) January 13, 2020
निवृत्तीतून माघार घेतलेला हा खेळाडू तब्बल ३ वर्षांनंतर करतोय पुनरागमन https://t.co/t9vFmdHNjB#म #मराठी #Cricket
— Maha Sports (@Maha_Sports) January 13, 2020