क्रिकेटच्या मैदानावर एकापाठोपाठ एक रेकॉर्ड मोडणारा स्टार फलंदाज विराट कोहली एक यशस्वी उद्योगपतीही आहे. कोहली आधीच अनेक मोठ्या ब्रँड्सच्या जाहिराती करतो. आता, एंडोर्समेंटसह त्यानं रेस्टॉरंट व्यवसायातही यश मिळवण्यासाठी तयारी केली आहे.
विराट कोहलीनं One8 Commune नावाचं रेस्टॉरंट सुरू केलं आहे, ज्याच्या शाखांचा आता विस्तार होत आहे. या रेस्टॉरंटचे एकामागून एक नवीन आउटलेट सुरू होत आहेत. हे रेस्टॉरंट्स इतके आलिशान आहेत, की तेथील सर्व्हिस आणि इंटीरियरचं सौंदर्य पाहण्यासारखं असतं. सोशल मीडियावर दररोज विराट कोहलीच्या रेस्टॉरंटचे फोटो व्हायरल होत असतात.
विराट कोहलीचे रेस्टॉरंट्स आतापर्यंत भारतातील 6 मोठ्या शहरांमध्ये सुरू झाले आहेत. या रेस्टॉरंटमधून विराटची चांगली कमाईही होत आहे. बंगळुरू, हैदराबाद, पुणे, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरांमध्ये या रेस्टॉरंटची शाखा खुली झाली आहे, जेथे ते चांगला व्यवसाय करत आहेत.
अलीकडील रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली लवकरच इतर 8 शहरांमध्ये रेस्टॉरंट उघडणार आहे. गेल्या दोन वर्षांत, दरवर्षी रेस्टॉरंटचे 3-4 नवीन आउटलेट उघडले आहेत. विराट कोहलीनं पुढील दोन आर्थिक वर्षांमध्ये सुमारे 10 नवीन रेस्टॉरंट उघडण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.
विराटच्या रेस्टॉरंटची शाखा केवळ भारतापुरतीच मर्यादित राहणार नाही. विराट लवकरच परदेशातही आपल्या रेस्टॉरंटचं आउटलेट सुरू करणार आहे. त्याची सुरुवात दुबईपासून होईल. चाहते विराट कोहलीच्या नव्या आउटलेटची आतुरतेनं वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे, रेस्टॉरंटच्या बहाण्यानं अनेक चाहत्यांना कोहलीला भेटण्याची संधीही मिळाली आहे.
विराट कोहली सध्या पत्नी अनुष्का शर्मासोबत लंडनमध्ये आहे. तेथे हे दोघे विराटच्या विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करत आहे. विराट कोहली 2 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपासून पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 आशिया चषकात शतक ठोकणारी पहिली महिला क्रिकेटपटू, दिग्गज मिताली राजचा विक्रम मोडला
गिल-यशस्वी ओपनिंग, रिंकू-दुबे फिनिशिंग; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 ची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?
रवींद्र जडेजाला संघातून वगळलं का? आगरकर म्हणाले, “त्याला निवडण्यात काही अर्थ…”