---Advertisement---

‘सलामीवीर’ विराट! आत्तापर्यंत सलामीला फलंदाजी करताना अशी आहे कोहलीची कामगिरी

On: शनिवार, मार्च 20, 2021 8:03 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये सुरू असलेल्या ५ टी२० सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना आज (२० मार्च) खेळला जात आहे. या मालिकेत २-२ अशी बरोबरी आहे. त्यामुळे हा सामना निर्णायक सामना आहे. तसेच या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून मोठा बदल पाहायला मिळाला आहे.

या सामन्यात भारताने अंतिम ११ जणांच्या संघात १ बदल केला आहे. केएल राहुल ऐवजी टी नटराजनला ११ जणांमध्ये संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्यात रोहित शर्मासह भारताचा कर्णधार विराट कोहलीने सलामीला फलंदाजी केली.

विराटची टी२०मध्ये भारताकडून सलामीला फलंदाजी करण्याची ही आठवी वेळ आहे. विराट कोहलीने यापूर्वी शेवटचे २०१८ मध्ये आयर्लंड विरुद्ध झालेल्या टी२० सामन्यात सलामी फलंदाजी केली होती.

त्याने सलामी फलंदाज म्हणून खेळलेल्या ७ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २८.२९ च्या सरासरीने १९८ धावा केल्या आहेत. यात त्याने १ अर्धशतक देखील झळकावले आहे. हे अर्धशतक त्याने न्यूझीलंड संघाविरुद्ध २०१२ मध्ये चेन्नई येथे खेळलेल्या टी२० सामन्यात केले होते. त्याने ७० धावांची खेळी केली होती.

पाचव्या टी -२० सामन्यासाठी भारतीय संघ

विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार) ,सूर्यकुमार यादव,रिषभ पंत ( यष्टीरक्षक),श्रेयस अय्यर,हार्दिक पंड्या,शार्दुल ठाकूर,वॉशिंग्टन सुंदर,भुवनेश्वर कुमार,राहुल चहर,टी नटराजन

महत्त्वाच्या बातम्या –

वनडे मालिकेत ‘हा’ गोलंदाज नसणार इंग्लंड संघाचा भाग?

‘हे’ तीन भारतीय खेळाडू निघाले पंचांना शोधायला, दिनेश कार्तिकने शेअर केले मीम

वाढदिवस विशेष : कपिल देवचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे मदन लाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---