भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली शुन्य धावेवर बाद झाला. एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात संघाला गरज असतानाचा कर्णधाराने पाचव्याच चेंडूवर एकही धाव न करता पव्हेलियनचा रस्ता धरला. यामुळे भारतीय संघ चांगला अडचणीत आला. मोईल अलीच्या जबरदस्त फिरकी घेतलेल्या चेंडूवर विराट त्रिफळाचीत झाला.
कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच झाला फिरकीपटूला शुन्यावर बाद
विराट कोहली ८९ कसोटी सामन्यांत पहिल्यांदाच फिरकीपटूला शुन्यावर बाद झाला आहे. विराट १४९ कसोटी डावांत आतापर्यंत ११ वेळा शुन्यावर बाद झाला असून त्यात तो पहिल्यांदाच फिरकीपटूचा बळी ठरला आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २६ वेळा विराट शुन्यावर बाद झाला असून तो यातही पहिल्यांदाच फिरकीपटूला शुन्यावर बाद झाला आहे. याच कारणामुळे मोईन अलीसाठी विराटची हीच विकेट ड्रीम विकेट ठरली आहे. विराट कोहलीला कसोटीत त्रिफळाचीत करणारा मोईल अली केवळ दुसरा ऑफ स्पिनर ठरला आहे. यापुर्वी विराटला ग्रॅमी स्वॉनने २०१२मध्ये त्रिफळाचीत केले होते.
इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद
विराट कोहली कसोटीत चौथ्यांदा इंग्लंडविरुद्ध शुन्यावर बाद झाला आहे. एखाद्या देशाविरुद्ध कसोटीत विराट पहिल्यांदाच चार वेळा शुन्यावर बाद झाला आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३, वेस्ट इंडिजविरुद्ध २, बांगलादेशविरुद्ध १ व श्रीलंकेविरुद्ध एकदा शुन्यावर बाद झालाय.
सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होणारा भारतीय कर्णधार
भारतीय कर्णधारांमध्ये सौरव गांगुली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १३वेळा कर्णधार असताना शुन्यावर बाद झाला आहे. विराट कोहली जेव्हा शनिवारी शुन्यावर बाद झाला तेव्हा कर्णधार असताना तो बाराव्यांदा शुन्यावर बाद झाला होता. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी ११ वेळा कर्णधार असताना शुन्यावर बाद झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvENG 2nd Test Live: पुजारा मागोमाग कोहली स्वस्तात बाद, भारत २२ षटकानंतर ३ बाद ८६ धावांवर
अखेर चेन्नईतील साडेसाती संपली! अर्धशतक करताच रोहितने संपवले ‘ते’ दुष्टचक्र
…आणि म्हणून कर्णधार विराट कोहलीने जसप्रीत बुमराहला दिली नाही दुसऱ्या कसोटीत संधी