---Advertisement---

किंग कोहली इज बॅक..! सचिनचा ‘हा’ कुणी मोडेल असं वाटलंही नव्हतं पण विराटने आज मोडलाच

On: बुधवार, जानेवारी 19, 2022 8:03 PM
virat-kohli-50
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यात बुधवार रोजी (१९ जानेवारी) बोलँड पार्क, पर्ल येथे पहिला वनडे सामना (First ODI) झाला. तब्बल ६ महिन्यांच्या कालावधीनंतर वनडे क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय संघ मैदानावर उतरला होता. हा सामना भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी नेहमीपेक्षा वेगळा सामना होता. कारण विराट जवळपास १० वर्षांनंतर निव्वळ खेळाडू म्हणून वनडे सामना खेळत होता. या सामन्यात दमदार फलंदाजी करत त्याने महान भारतीय फलंदाज सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याचा एक लक्षणीय विक्रमही मोडित काढला आहे. 

दक्षिण आफ्रिकेच्या २९७ धावांच्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर आणि प्रभारी कर्णधार केएल राहुल स्वस्तात बाद झाला. केवळ १२ धावांवर दक्षिण आफ्रिकी गोलंदाज ऍडम मार्करमने यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकच्या हातून त्याला झेलबाद केले. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर विराट फलंदाजीला आला होता.

व्हिडिओ पाहा- सचिन-कांबळीच्या करामतीने गांगुलीच्या रुममध्ये झालेलं पाणीच पाणी| 

सलामीवीर शिखर धवनसोबत बचावात्मक खेळी करत विराटने एक बाजू धरून ठेवली आणि १० धावांचा आकडा ओलांडताच मास्टर ब्लास्टर सचिनलाही परदेशात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात मागे (Virat Overtakes Sachin) सोडले. तो आता भारताबाहेर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. तर दुसरीकडे सचिन परदेशातील ५०६५ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.

सचिनपाठोपाठ एमएस धोनी, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली हे माजी भारतीय क्रिकेटर या यादीत पहिल्या ५ क्रमांकावर आहेत. तर वनडेतील सक्रिय फलंदाज रोहित शर्मा आणि शिखर धवन हे या यादीत टॉप-१० फलंदाजांमध्ये आहेत. विराटसोबत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५० हून अधिक धावांची भागिदारी करणारा सलामीवीर धवन २५०० पेक्षा जास्त धावांसह दहाव्या क्रमांकावर आहे. तर या मालिकेचा भाग नसलेला रोहित ३३१० धावांसह सातव्या क्रमांकावर आहे.

परदेशात वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय (Indians With Most Runs In Away ODIs)
५०८० धावा- विराट कोहली*
५०६५ धावा- सचिन तेंडूलकर
४५२० धावा- एमएस धोनी
३९९८ धावा- राहुल द्रविड
३४६८ धावा- सौरव गांगुली
३४३४ धावा- युवराज सिंग
३३१० धावा- रोहित शर्मा
२९९९ धावा- विरेंद्र सेहवाग
२८०४ धावा- मोहम्मद अझिरुद्दीन
२५६७ धावा- शिखर धवन*

महत्त्वाच्या बातम्या-

VIDEO: चित्याची चपळाई आणि घारीची नजर! ‘पदार्पणवीर’ वेंकटेशच्या ‘रॉकेट थ्रो’वर मार्करम ६ धावांवर रनआऊट

काय सांगता! विराट पहिल्यांदाच खेळला वयाने लहान कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली, पाहा चकीत करणारी आकडेवारी

कसोटी मालिका गमावूनही कोहली, बुमराहची आयसीसी क्रमवारीत ‘उंच उडी’, रोहितही टॉप-१० मध्ये

हेही पाहा- 

सचिन-कांबळीच्या करामतीने गांगुलीच्या रुममध्ये झालेलं पाणीच पाणी| Sachin-Kambli Prank on Ganguly

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---