---Advertisement---

सरावाच्या वेळी कोहलीला ‘क्यूट’ पाहुण्याने भेट देताच अनुष्का शर्माची आली ‘अशी’ प्रतिक्रिया

---Advertisement---

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा झाल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीला काही काळ विश्रांती देण्यात आली होती. न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेसाठी देखील तो उपलब्ध नव्हता. आता न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून तो पुनरागमन करणार आहे. याच पार्श्वभूमीवर त्याने मंगळवारी (२३ नोव्हेंबर) जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. दरम्यान, मुंबईत सराव करत असताना त्याने काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचे इंस्टाग्रामवर कोट्यवधी फॉलोवर्स आहेत. त्यामुळे चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी तो काही ना काही शेअर करत असतो. नुकताच त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो मुंबईत सराव करून झाल्यावर विश्रांती करताना दिसतोय.

तसेच तो विश्रांती करत असताना त्याच्याजवळ एक गोंडस मांजर येऊन पोहोचलं. जे पाहताच विराट कोहलीने उचलून घेतलं. त्याने मांजर सोबत फोटो क्लिक केले आणि आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले. ज्यावर कॅप्शन म्हणून त्याने,”सराव सुरू असताना मांजरीकडून एक क्विक हॅलो.”

या फोटोवर प्रतिक्रिया देत विराटची पत्नी अनुष्का शर्माने “हॅलो बिल्ली,” असे लिहिले होते. ज्यावर प्रतिसाद देत विराट कोहलीने “दिल्लीचा लौंडा आणि मुंबईची मांजर,” असे लिहिले.

विराट कोहली सध्या आपल्या कुटुंबासह मुंबईत आहे, तर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध कानपूरमध्ये पहिल्या कसोटी सामन्यासाठी सराव करण्यात व्यस्त आहे. विराट कोहली वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करणार आहे.

सध्या विराट सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टीव्ह आहे. रविवारी (२१ नोव्हेंबर) देखील त्याने अनुष्का शर्मा सोबतचा एक सेल्फी शेअर केला होता. ज्यावर कॅप्शन म्हणून त्याने ‘माय रॉक’ असे लिहिले होते.

Photo Courtesy: Instagram/virat.kohli

 

नुकताच भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला ३ टी२० सामन्यांच्या मालिकेत पराभूत करत मालिका ३-० ने आपल्या नावावर केली. आता भारतीय संघासमोर कसोटी मालिकेचे लक्ष्य असणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २५ नोव्हेंबर पासून कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर पार पडणार आहे. तर मालिकेतील दुसरा कसोटी सामना ३ डिसेंबर पासून मुंबईमध्ये पार पडणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

हॉटेलमध्ये घंटानाद आणि घुंगरांसह रामभजन, भारत-न्यूझीलंड क्रिकेटपटूंचे कानपूरमध्ये अनोखे स्वागत

“रिषभ त्याची जबाबदारी समजण्यात ठरला अपयशी”; दोन दिग्गजांनी घेतले निशाण्यावर

पाकिस्तानने ‘चिंटिंग’ करत जिंकली बांगलादेशविरुद्धची शेवटची टी२० मॅच, ‘या’ प्रसंगामुळे उपस्थित झाला प्रश्न

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---