भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याच्यासाठी सरते वर्ष संमिश्र ठरले. पहिले 7 महिने तो फलंदाजीत तितका यशस्वी ठरला नाही. मात्र, त्यानंतर आशिया चषकापासून वर्षाच्या अखेरीपर्यंत त्याच्या बॅटमधून धावा येताना दिसल्या. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्याकडून अद्यापही धावा झालेल्या नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवरच श्रीलंकेचा माजी कर्णधार व दिग्गज यष्टीरक्षक कुमार संगकाराने एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
संगकाराने नुकतीच एका भारतीय वृत्तवाहिनीशी चर्चा केली. यामध्ये त्याने विराट कोहली याच्या फॉर्म व कारकिर्दीविषयी महत्त्वाचे विधान केले. विराट अतिक्रिकेट खेळत असल्याचे त्याने म्हटले. संगकारा म्हणाला,
“मला वाटते की विराटशी चर्चा करणे गरजेचे आहे. तो भारतासाठी सर्वाधिक क्रिकेट खेळतो. तो वर्कलोड मॅनेजमेंट कसा करतो किंवा केला पाहिजे हे जाणून घ्यायला हवे. मला वाटते की, तो जेव्हा भारतीय संघासाठी खेळेल तेव्हा तो ताजातवानाच हवा. जेणेकरून तो संघाच्या विजयात सर्वाधिक योगदान देऊ शकेल.”
विराट कोहली हा सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. मात्र, मागील जवळपास तीन वर्षांपासून त्याच्या बॅटमधून कोणतेही आंतरराष्ट्रीय शतक आले नव्हते. अखेर ऑगस्टमध्ये झालेल्या आशिया चषकात त्याने शतकांचा हा दुष्काळ संपवला. टी20 प्रकारातील आपले पहिले शतक साजरे करत त्याने 1000 पेक्षा जास्त दिवसानंतर शतक झळकावले. यानंतर झालेल्या टी20 विश्वचषकात तो सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज ठरला. तर, वर्षाच्या अखेरीस बांगलादेश दौऱ्यावरही वनडेत शतक करून त्याने आपल्या शतकांची संख्या 72 पर्यंत नेली. मात्र, त्याने वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून विश्रांतीच्या कारणाने आपले नाव मागे घेतले आहे. परंतु, वनडे मालिकेत तो संघात पुनरागमन करेल.
(Virat Kohli Playing Maximum Cricket For India Kumar Sangakkara Said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कुलदीपचे कौतुक केल्यामुळे दिनेश कार्तिक अडचणीत, प्रशिक्षकांनीच केले आरसा दाखवण्याचे काम
जबरदस्त योगायोग! ‘या’ फलंदाजाने ठोकले 2022 आणि 2023चे पहिले आंतरराष्ट्रीय शतक, केल्या सारख्याच धावा