शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर रविवारी (१७ ऑक्टोबर) टी -२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये पार पडणार आहे. तर भारतीय संघाची पहिली लढत २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हा सामना हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी दोन्ही देशातील चाहते उत्सुक आहे. दरम्यान, विराट कोहलीने रिषभ पंतला एक आव्हान दिलं आहे.
आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर विराट कोहली आणि रिषभ पंत यांची एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ स्टार स्पोर्ट्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामधे कर्णधार विराट कोहली युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतची पायखेची करताना दिसून येत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहली रिषभ पंतला म्हणतोय की, “क्रिकेटमध्ये षटकार सामना जिंकून देत असतात.” ज्यावर उत्तर देताना रिषभ पंत म्हणतो, “काळजी करू नको भाऊ, मी रोज सराव करतोय. तुम्हाला माहित आहे ना, एका यष्टीरक्षकानेच षटकार मारून विश्वचषक जिंकून दिला होता.”
यावर प्रतिसाद देत विराट कोहली म्हणतो की, “हा, परंतु माहीनंतर भारतीय संघात एकही असा यष्टिरक्षक झाला नाही.” यावर रिषभ पंत म्हणतो की, “भाई, मी आहे ना यष्टिरक्षक.” हे ऐकताच विराट कोहली म्हणतो की, “माझ्याकडे भरपूर यष्टिरक्षक फलंदाज आहेत, पाहूया सराव सामन्यात कोण खेळणार.” विराटचे हे बोल पाहून, रिषभ पंत निराश झाल्याचे पाहायला मिळाले.
https://www.instagram.com/p/CVAqYlhI0Lf/?utm_medium=copy_link
भारत – पाकिस्तान सामन्यापूर्वी भारतीय संघ सराव सामने खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाचे सराव सामने १८ आणि २० ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. १८ ऑक्टोबर रोजी भारतीय संघाचा सराव सामना ऑस्ट्रेलिया संघासोबत होणार आहे. तर २० ऑक्टोबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये सराव सामना पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
एकदम रॉयल! ‘या’ महागड्या हॉटेलात थांबणार भारतीय संघ; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लाजवाब’
जर कोलकाता जिंकले, तर असा कारनामा करणारा मॉर्गन बनणार केवळ चौथा कर्णधार
बापरे बाप! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात अविश्वसनीय डॉट चेंडू; क्रीझवर ३६० डिग्री फिरला फलंदाज