भारत आणि इंग्लंड यांच्यातील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर १० गडी राखून मोठा विजय मिळवला आहे. या विजयासोबतच भारतीय संघ मालिकेत २-१ ने पुढे आला आहे. तसेच इंग्लंड संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. अशातच तिसऱ्या सामन्यात मिळवलेल्या विजयानंतर भारतीय कर्णधाराने २ खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले आहे.
आर अश्विन आणि अक्षर पटेल यांच्या जोडीबद्दल विराट म्हणाला…
तिसऱ्या कसोटी सामन्यात आपल्या गोलंदाजीने भारतीय संघाला विजय मिळवून देणाऱ्या आर अश्विन आणि अक्षर पटेल यांचे कर्णधार विराट कोहलीने कौतुक केले आहे. तो म्हणाला, “मला नाही माहित गुजरातमध्ये असे काय आहे, इथून इतके डाव्या हाताचे फिरकी गोलंदाज येतात. जर खेळपट्टीवर मदत मिळत असेल तर, अक्षर पटेल खूप प्रभावी ठरू शकतो.”
“मला वाटते की, जे अश्विनने केले आहे त्यासाठी आपल्याला उभे राहून अभिनंदन करण्याची गरज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अश्विन या दशकातील लेजेंड आहे. एक कर्णधार म्हणून मी खूप खुश आहे की, तो माझ्या संघात आहे. आम्हाला आणखी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. व्यस्त कार्यक्रमातून काही दिवस आम्हाला जास्त मिळाले आहेत,” असे पुझे विराटने सांगितले.
तिसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजांची गुणवत्ता इतकी चांगली नव्हती
या सामन्यात पूर्णपणे भारतीय फिरकी गोलंदाजांचा बोलबाला होता. आर अश्विन आणि अक्षर पटेल यांच्या जोडीने मिळून १८ गडी बाद केले. यात अक्षर पटेलला ११ गडी बाद करण्यात यश आले तर अश्विनने ७ गडी बाद केले.
अशातच कर्णधार विराट कोहली म्हणाला, “खरं सांगू तर मला नाही वाटत की फलंदाजीची गुणवत्ता इतकी चांगली होती. आम्ही फलंदाजी करतांना ३ गडी बाद असताना १०० धावा केल्या होत्या. त्यांनतर १५० धावांच्या आत पूर्ण संघ बाद झाला. चेंडू खूप चांगल्या प्रकारे बॅटवर येत होता आणि पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी ही एक चांगली खेळपट्टी होती. परंतु दोन्ही संघाची फलंदाजी खराब राहिली.”
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsENG: ‘अशा भज्जी-कुंबळेने ८००-१००० विकेट्स घेतल्या असत्या,’ माजी भारतीय अष्टपैलूचे टीकास्त्र
एक कर्णधार म्हणून मी आनंदी आहे की, तो माझ्या संघाचा भाग आहे; पाहा कुणाची केली कोहलीने प्रशंसा
“त्याच्यात क्षमता आहे, पण तो सतत चुकीचा…” गिलच्या खराब फलंदाजीवर भारतीय दिग्गजाने व्यक्त केली नाराजी