भारतीय संघाचने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका बरोबरी सोडवली. केपटाऊनमध्ये मालिकेतील दुसरा आणि शेवटचा टी-20 सामना बुधवारी सुरू झाला. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी भारताने यजमान संघाला 7 विकेट्स राखून मात दिली. भारताला या सामन्यात विजय मिळवून देण्यासाठी गोलंदाजांची भूमिका महत्वाची राहिली. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज डीन एल्गर याचा हा शेवटचा कसोटी सामना असल्यामुळे भारतीय संघाकाडून त्याला खास भेट दिली गेली.
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील हा दुसरा कसोटी सामना केपटाऊनमध्ये खेळला गेला. गोलंदाजांसाठी बनलेल्या या खेळपट्टीवर फलंदाजांचा चांगलाच घाम निघाला. दक्षिण आफ्रिकने पहिल्या डावात 55, तर दुसऱ्या डावात 176 धावांची खेळी केली. भारतीय संघाला पहिल्या डावात 156 धावांपर्यंत मजल मारता आली, तर दुसऱ्या डावात संघाने 79 धावांचे लक्ष्य अवघ्या 12 षटकांमध्ये गाठले.
उभय संघांतील या सामना संपल्यानंतर भारतीय संघाकडून डीन एल्गर (Dean Elgar) याला विराट कोहली (Virat Kohli) याची जर्सी भेट दिली गेली. या जर्सीवर संघातील सर्व खेळाडूंच्या स्वाक्षरी केलेल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या हस्ते ही जर्सी एल्गरला त्याच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात मिळाली. दरम्यान, एल्गरला आपल्या शेवटच्या कसोटीत पुन्हा एकदा कर्णधाराच्या भूमिकेत खेळण्याची संधीही मिळाली. नियमित कर्णधार टेंबा बावून या मालिकेत खेळत नसल्यामुळे एल्गर कर्णधाराच्या भूमिकेत हा सामना खेळला.
Virat Kohli presented Dean Elgar his Jersey signed by team India.
– A class act by team India and Virat..!!! 🇮🇳 pic.twitter.com/gOPU5odiCD
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 4, 2024
The wonderful moment when Virat Kohli presented his signed Jersey to Dean Elgar and congratulated him.pic.twitter.com/4CE1PIQ6cA
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 4, 2024
एल्गरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतवर एक नजर टाकली, तर त्याने 86 कसोटी सामन्यांमध्ये 37.92च्या सरासरीने 5347 धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याने 8 सामन्यांमध्ये 104 धावांचे योगदान दिले. कारकिर्दीतील एकूण 18 कसोटी सामन्यांमध्ये एल्गर दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार होता. यातील 9 सामने त्याने कर्णधार म्हणून संघाला जिंकवून दिले. (Virat Kohli presented his signed Jersey to Dean Elgar and congratulated him.)
महत्वाच्या बातम्या –
अमनोरा पीवायसी एचटीबीए कप बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजन
रोहित शर्माने केपटाऊनच्या खेळपट्टीवर उपस्थित केला प्रश्न, विजयानंतर आयसीसीकडे केली मोठी डिमांड