भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या नावे अनेक मोठमोठे विक्रम आहेत. तसेच गेलो काही वर्षे त्याने क्रिकेटच्या तीनही स्वरुपामध्ये अधिराज्य गाजवले आहे. परंतु त्याच्या नावे असा एक विक्रम आहे, जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणालाच करता आला नाही. चला तर जाणून घेऊ.
विराट कोहली याबाबतीत आहे क्रिकेट इतिहासातील अव्वल फलंदाज
असे खूप कमी खेळाडू आहेत, ज्यांना क्रिकेटच्या तीनही स्वरुपात आपली छाप सोडण्यात यश आले आहे. या यादीत भारतीय कर्णधार विराट कोहली अव्वलस्थानी आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रनमशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराटने कसोटी क्रिकेटमध्ये देखील अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक फलंदाज आहेत. ज्यांनी क्रिकेटच्या तीनही स्वरुपात मिळून १०००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या यादीत विराट कोहलीचा देखील समावेश आहे.
परंतु या यादीत विराट कोहली इतरांपेक्षा वेगळा ठरतो. कारण, तीनही स्वरुपातील प्रत्येक डावाचा विचार केला तर विराटने ४७.३ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. याबाबतीत तो क्रिकेट विश्वातील अव्वल दर्जाचा फलंदाज आहे. (Virat Kohli proves himself number one Batsman in history in this special case)
या यादीत दिग्गज खेळाडूंचा समावेश
ऑस्ट्रेलियन संघाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने कसोटी, वनडे आणि टी२० सामने खेळताना प्रत्येक डावात ४४ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरने ४३.९ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तसेच दिग्गज खेळाडू विवियन रिचर्ड्स या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी ४३.७ च्या सरासरीने धावा केल्या होत्या. परंतु महत्वाची बाब म्हणजे,जेव्हा विवियन रिचर्ड्स खेळत होते. तेव्हा टी-२० क्रिकेट हा प्रकार नव्हता. तसेच पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियन संघाचा विस्फोटक फलंदाज मॅथ्यु हॅडेन आहे. त्याने ४३.३ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
नाबाद राहिल्याने वाढते सरासरी
विराट कोहलीने प्रत्येक डावात ४७.३ ने धावा करत अव्वल क्रमांक पटकावला आहे. परंतु क्रिकेटच्या तीनही स्वरुपात मिळून त्याची सरासरी ५० पेक्षा अधिक आहे. याचे कारण असे की सरासरी काढताना फलंदाजांची नाबाद खेळी ग्राह्य धरली जात नाही.
कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये ९२ सामने खेळले आहेत. या सामन्यातील १५५ डावांमध्ये तो १० वेळेस नाबाद राहिला आहे. तर २४५ वनडे सामन्यांमध्ये तो ३९ वेळेस नाबाद राहिला आहे. तसेच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तो २४ वेळेस नाबाद राहिला आहे. विराट कोहली आपल्या एकूण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ७३ वेळेस नाबाद राहिला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ५२.०५, वनडे क्रिकेटमध्ये ५९.०७ आहे तर टी-२० क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ५२.६५ आहे.
महत्वाच्या बातम्या-
टी२०त ५ शतके झळकावणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरची कारकिर्द संपुष्टात! मिळाला निवृत्तीचा सल्ला
मोठी बातमी! श्रीलंकेच्या २९ खेळाडूंचा भारताविरुद्ध खेळण्यास होकार, ‘या’ क्रिकेटरने घेतली माघार
बाप कर्णधार असला तरीही धोनी खेळला आहे ‘या’ ५ सिनीयर-ज्युनियर कर्णधारांच्या नेतृत्त्वाखाली