इंडियन प्रीमीयर लीग(आयपीएल) मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर(आरसीबी) संघाने त्यांच्या नवीन लोगोचे आज(14 फेब्रुवारी) अनावरण केले आहे. हा नवीन लोगो पाहून आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने आनंद व्यक्त केला आहे.
आरसीबीने या लोगोचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला. तसेच लोगोचा फोटोही शेअर केला. याबरोबरच त्यांनी 2008 पासून आत्तापर्यंत बदललेल्या लोगोंचाही व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे.
THIS IS IT. The moment you've been waiting for. New Decade, New RCB, New Logo! #PlayBold pic.twitter.com/miROfcrpvo
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 14, 2020
आरसीबीच्या या नवीन लोगोमध्ये त्यांचा प्रमुख लाल रंग बॅकग्राउंडला आहे. तसेच सोनेरी रंगाचा सिंह मागील 2 पायांवर उभा असून गर्जना करत आहे. तसेच त्याखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघाचे नाव लिहिलेले आहे.
Embodying the bold pride and the challenger spirit, we have unleashed the rampant lion returning him to the Royal lineage.
New Decade, New RCB, and this is our new logo #PlayBold #NewDecadeNewRCB pic.twitter.com/bdf1kvXYUl
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 14, 2020
हा लोगो पाहून विराटने आंनद झाला असल्याचे ट्विट केले आहे. त्याने 2008 पासून आत्तापर्यंत बदललेल्या लोगोंचा आरसीबीचा व्हिडिओ रिट्विट करताना लिहीले आहे की ‘लोगों (LOGO) का काम है कहना. आरसीबी आपला नवीन लोगो पाहून आनंद झाला. हा अभिमानाचा आणि आव्हानाचा प्रतिक आहे, ज्याच्यासह आपले खेळाडू मैदानात उतरतात. आता आयपीएल 2020 ची आतुरतेने प्रतिक्षा आहे.’
LOGO ka kaam hai kehna. ???? Thrilled to see our new @rcbtweets logo. It embodies the Bold pride and challenger spirit that our players bring to the field. Can’t wait for #IPL2020 #NewDecadeNewRCB ???? https://t.co/n8c24JqbAl
— Virat Kohli (@imVkohli) February 14, 2020
या नवीन लोगोचे अनावरण करण्याआधी बुधवारी आरसीबीने त्यांच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्सवरील प्रोफाईल पिच्चर, पोस्ट काढून टाकल्या होत्या. याबद्दल विराटसह युजवेंद्र चहल आणि एबी डिविलियर्स यांनीही आश्चर्य व्यक्त केले होते.
पण आज आरसीबीने ‘नवीन दशक, नवीन आरसीबी’ अशा अर्थाचे कॅप्शन देत नवीन लोगोचे अनावरण केले. त्यामुळे त्यांनी मागील सर्व पोस्ट काढून टाकण्याचे कारण स्पष्ट झाले आहे.
भारतात परतताना तुटली यशस्वी जयस्वालची ट्रॉफी…
वाचा- ????https://t.co/oXBhI9Gt8s????#म #मराठी #Cricket #TeamIndia @yashasvi_j— Maha Sports (@Maha_Sports) February 14, 2020
अखेर किंग कोहलीच्या मानाच्या त्या सिंहासनावर तो पाकिस्तानी खेळाडू विराजमान
वाचा????https://t.co/cQspDavVas????#म #मराठी #Cricket #ICCranking— Maha Sports (@Maha_Sports) February 14, 2020






