जागतिक महामारी कोविड-१९चा प्रभाव सर्व क्षेत्रात दिसून आला आहे. त्यास क्रिकेटही अपवाद नाही. कोरोना विषाणूमुळे क्रिकेटपटूंना आता बायो बबलमध्ये राहून क्रिकेट खेळावे लागत आहे. आयपीएल, इतर द्विपक्षीय सामने असतील किंवा येऊ घातलेला टी२० विश्वचषक असेल, या सर्व स्पर्धा बायो बबलमध्ये होणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले होते. यावर भाष्य करत विराटने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे आणि खेळाडूंना बायो बबलमध्ये राहणे कसे असते, हे त्याने मजेदार पद्धतीने स्पष्ट केले आहे.
विराटने एका जाहिरात शूटचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो खुर्चीवर बसलेला आहे आणि त्याला दोरीने बांधलेले आहे. हा फोटो शेअर करताना विराटने लिहिले की, ‘बायो बबलमध्ये खेळणे हे असेच असते.’ विराटच्या या फोटोवर मीम्स देखील केले जात आहेत आणि काही चाहते त्याला जोरदार ट्रोल देखील करत आहेत.
काहींनी तर येत्या टी२० विश्वचषकावरुन त्याला ट्रोल केले आहे. कोहलीला असेच बांधून ठेवल्यास भारत तिकडे टी२० विश्वचषक अशा प्रतिक्रिया काहींनी दिल्या आहेत.
This is what playing in bubbles feels like. pic.twitter.com/e1rEf0pCEh
— Virat Kohli (@imVkohli) October 15, 2021
दरम्यान इंडियन प्रीमियर लीग २०२१ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा प्रवास संपला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हा संघ चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. आयपीएलनंतर विराट कोहली आता आयसीसी टी -२० विश्वचषकाची तयारी सुरू करेल. आरसीबीचा कर्णधार म्हणून विराटचा हा शेवटचा आयपीएल हंगाम होता आणि आता भारतीय संघाचा टी -२० कर्णधार म्हणून विराटची ही शेवटची आयसीसी स्पर्धा असेल. विराटने टी -२० विश्वचषकानंतर टी -२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धा झाल्यावर लगेच न्यूझीलंड संघ भारत दौरा देखील होणार आहे. या दौऱ्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ विराट कोहलीसह आपल्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊ शकते. यामध्ये रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. ही टी -२० मालिका विश्वचषक संपल्यानंतर लगेच तीन दिवसांनी १७ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नेहमी धोनीला कोसणाऱ्या गंभीरचे बदलले सूर, आयपीएल फायनलपूर्वी उधळली स्तुतीसुमने; पाहा काय म्हणाला?
Photo: आयपीएलमधून मिळाला छोटा ब्रेक; बुमराहने पत्नी संजनासह ‘अशा’प्रकारे घालवला वेळ
बिनजोड टीम इंडिया! टी२० मध्ये विराटसेनेचा प्रतिस्पर्ध्यांवर आहे अक्षरशः दबदबा