ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने(David Warner) रविवारी त्याची 3 वर्षीय मुलगी(Daughter) इंडी रेचा(Indi Rae) एक खास व्हिडिओ शेअर केला होता. या व्हि़डिओमध्ये इंडी फलंदाजी करताना दिसत आहे. त्याचबरोबर ती ‘मी विराट कोहली आहे’, असे देखील सांगत आहे.
वॉर्नरने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिले आहे की ‘मला याबद्दल खात्री नाही. पण इंडीला विराट कोहली व्हायचे आहे. याला कॅप्शन द्या’
https://www.instagram.com/p/B4rXRlhJu1q/
This little girl has spent too much time in India. Wants to be @imVkohli pic.twitter.com/Ozc0neN1Yv
— Candice Warner (@CandiceWarner31) November 10, 2019
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही चाहत्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लेडी कोहली असे देखील म्हटले आहे.
तसेच यावर भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही(Virat Kohli) प्रतिक्रिया दिली आहे. ‘मस्त मित्रा. ऑस्ट्रेलियाच्या घरात मी एका भारतीय चाहत्याला पाहत आहे. ती खूप गोंडस आहे.’, असे विराटने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
विराटला नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेश विरुद्धच्या टी20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे तो त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माबरोबर सुट्ट्यांची मजा घेत होता. आता तो 14 नोव्हेंबरपासून बांगलादेश विरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी पुन्हा एकदा भारतीय संघात समील होईल.
मॅक्सवेल पाठोपाठ हा खेळाडूही मानसिक आजाराने त्रस्त, पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास दिला नकार
वाचा👉https://t.co/7PVN8WhM54👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 11, 2019
बांगलादेश विरुद्ध श्रेयस अय्यर ठरला हिटमॅन रोहित शर्मापेक्षा भारी!
वाचा👉https://t.co/3KWKGFkFJ8👈#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #ShreyasIyer— Maha Sports (@Maha_Sports) November 11, 2019