भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याचे जगभरातून भरपूर चाहते आहेत. ते नेहमीच त्याच्यासाठी काही ना काही विशेष बॅनर, पोस्ट, फोटो तयार करून स्टेडियममध्ये त्याचे लक्ष वेधतात. त्याने 5 नोव्हेंबरला 34वा वाढदिवस सेलेब्रेट केला. यादिवशी तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्याच्याच वाढदिवसाचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चाहते एका सुरूत हॅप्पी बर्थडे म्हणताना ऐकायला येत आहे.
हा व्हिडिओ भारत-झिम्बाब्वे टी20 विश्वचषकाच्या सामन्यादरम्यानचा (6 नोव्हेंबर) आहे. आर अश्विन (R Ashwin) गोलंदाजी करत होता तेव्हा विराट कोहली (Virat Kohli) सीमारेषेवर उभा होता. त्याचवेळी चाहते एका सुरात ‘हॅप्पी बर्थडे टू यू डीयर कोहली, हॅप्पी बर्थडे टू यू विराट’, असे म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते. विराटनेही मग चाहत्यांना धन्यवाद म्हटले. तरीही चाहत्यांनी त्यांचा बर्थच्या गाण्याचा सूर चालूच ठेवला, त्यावेळी त्याने हसत हात जोडून म्हटले, ‘आता बस झाले.’
आशिया चषक 2022च्या आधी विराट आऊट ऑफ फॉर्म होता. नंतर तो जेव्हापासून लयीत आला तेव्हापासून ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकातही झळकत आहे. त्याने या स्पर्धेच्या हंगामात 5 सामने खेळताना 123च्या सरासरीने 246 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध नाबाद 82, नेदरलॅंड्सविरुद्ध नाबाद 62 आणि बांगलादेशविरुद्ध नाबाद 64 धावा केल्या होत्या.
https://twitter.com/anushkaalol/status/1589229972354629633?s=20&t=RJVuoWfoqWMtrV8jWYkrxg
विराट आणि ऑस्ट्रेलिया याचे नाते वेगळेच आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या मैदानांवर अनेक महत्वाच्या आणि मोठ्या खेळी केल्या आहेत. या स्पर्धेत भारत उपांत्य फेरीत पोहोचला आहे. तो सामना 10 नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध ऍडलेड ओव्हलवर खेळला जाणार आहे. ओव्हलवर तर विराट चमकदार खेळी करण्यात पटाईत आहे.
या स्पर्धेत भारताने सुपर 12मध्ये पाकिस्तान, नेदरलॅंड्स, बांगलादेश आणि झिम्बाब्वे या संघाना पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एकमेव सामना या स्पर्धेत गमावला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! रे*प केसचा आरोपी धनुष्का गुणतिलकाची श्रीलंका संघातून हकालपट्टी, जामीनही नाही मिळाला
वाईट काळात केवळ ‘या’ व्यक्तीने वाढवला विराटचा आत्मविश्वास; स्वतः केला खुलासा