टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत साखळी फेरीचा अखेरीपर्यंत तब्बल सहा उलटफेर पाहायला मिळाले. रविवारी (06 नोव्हेंबर) टी20 विश्वचषकात सुपर 12 फेरीतील 40 वा सामना नेदरलँड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पार पडला. या सामन्यात नेदरलँड्स संघाने 13 धावांनी विजय मिळवत दक्षिण आफ्रिका संघाला स्पर्धेतून बाहेर काढले. संघाच्या पराभवानंतर कर्णधार टेंबा बवुमा (Temba Bavuma) याच्यावर सातत्याने टीका होत आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू व प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक टॉम मूडी (Tom Moody) यांनी देखील बवुमावर निशाणा साधलेला दिसतोय.
दक्षिण आफ्रिका संघ या विश्वचषकात विजेतेपदाचा दावेदार म्हणून सहभागी झाला होता. त्यांनी स्पर्धेतील सर्वात मजबूत मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला देखील पराभूत केलेले. मात्र, आधी पाकिस्तानने व त्यानंतर अनपेक्षितरित्या नेदरलँड्सने त्यांना पराभूत केले. त्यामुळे त्यांचा उपांत्य फेरीत जाण्याचा मनसुबा उधळला गेला. संघाच्या या खराब कामगिरीनंतर कर्णधार टेंबा बवुमा याला अनेकांकडून लक्ष केले जात आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यालाच संघाच्या पराभवासाठी जबाबदार धरले. चाहत्यांनंतर थेट ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू व दिग्गज क्रिकेट प्रशिक्षक टॉम मूडी यांनी देखील त्याच्यावर टीकास्त्र डागले.
एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना मूडी म्हणाले,
“बवुमा संघात असणे म्हणजे हत्ती पाळण्यासारखे आहे. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंना विश्वचषकात बाकावर बसून राहावे लागले. हा एक गंभीर मुद्दा आहे.”
कर्णधार बवुमा याच्या टी20 संघातील जागेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे असते. तो टी20 साठी आवश्यक अशा स्ट्राईक रेटने धावा काढू शकत नाही. विश्वचषकात त्याने 5 डावात 112 च्या स्ट्राईक रेटने केवळ 70 धावा केल्या. त्याच्या एकूण टी20 कारकीर्दीतील स्ट्राइक रेटही केवळ 116 आहे. (Tom Moody Slams Temba Bavuma After Soutrh Africa Loss)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिकी पॉंटिंगची भविष्यवाणी! म्हणाला ‘हा’ बनू शकतो ऑस्ट्रेलियाचा पुढचा कर्णधार
टी20 विश्वचषकाच्या धामधुमीत किंग कोहली ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’, महिलांमध्ये ‘ही’ ठरली विजेती