सध्या सुरु असलेल्या आयसीसीस चॅम्पियन्स ट्रॉफीचा विराट कोहलीला चांगलाच फायदा झालेला आहे. सर्वप्रथम त्याला आपली लय गवसली आणि आता त्याने आयसीसीस फलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. एबी डिव्हिलर्स आणि डेविड वॉर्नरला मागे टाकत त्याने ही कामगिरी केली. चॅम्पियन्स ट्रॉफच्या सुरवातीला कोहली ३ ऱ्या क्रमांकावर होता पण पाकिस्तान विरुद्ध केलेल्या ८१ नाबाद आणि साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या ७६ नाबाद या फलंदाजीच्या जोरावर त्याने पहिले स्थान गाठले.
BREAKING: @imVkohli and Josh Hazlewood go to No.1 in the @MRFWorldwide Rankings!
READ –https://t.co/2bJe5GiZiv pic.twitter.com/3rS2agOTrI
— ICC (@ICC) June 13, 2017
तसेच भारताचा सलामी फलंदाज आणि आयसीसी स्पर्धांचा विशेषज्ञ शिखर धवन देखील टॉप १० मध्ये आला आहे. त्याने १५ व्या स्थानावरून १० व्या स्थानी झेप घेतली आहे. त्याबरोबरच रोहित शर्मा आणि एम एस धोनी मात्र एक एक स्थान घसरत १३ व्या व १४ व्या स्थानी आले आहेत.
बलाढ्य ऑस्ट्रेलियाला मात्र या चॅम्पियन्स ट्रॉफी मधून काही विशेष हाती लागले नाही, केवळ त्यांचा गोलंदाज जॉश हॅझेलवूड वगळता. हॅझेलवूडने गोलंदाजांमध्ये आवडलं स्थान पटकावले आहे. या स्पर्धेत हॅझेलवूडने सर्वाधिक ९ बळी ३ सामन्यात घेतले आहेत, ज्यात न्यूझीलंड विरुद्ध ५२-६ ही त्याची आकडेवारी होती.
टॉप १० फलंदाज:
रँक (+/-) खेळाडू संघ गुण सरासरी
१ (+२) विराट कोहली भारत ८६२ ५३.८२
२ ( – ) डेविड वॉर्नर ऑस्ट्रेलिया ८६१ ४४. ७२
३ (-२) एबी डिव्हिलर्स साऊथ आफ्रिका ८४७ ५३. ५५
४ (+१) जो रूट इंग्लंड ७९८ ४९. ४२
५ (+४) केन विलियमसन न्यूझीलंड ७७९ ४६. ९८
६ (-२) क्विंटन डीकॉक साऊथ आफ्रिका ७६९ ४३.४४
७ (-१) फाफ डूप्लेसी साऊथ आफ्रिका ७६८ ४३.४१
८ (-१) बाबर आझम पाकिस्तान ७६३* ५२. ७३
९ (-२) मार्टिन गप्टिल न्यूझीलंड ७४९ ४३. ३०
१० (+५) शिखर धवन भारत ७४६ ४४.८१