---Advertisement---

एकट्या विराटची कामगिरी पाकिस्तानला घाम फोडण्यासाठी पुरेशी, पाहा ‘रनमशीन’ची जबरदस्त आकडेवारी

---Advertisement---

टी२० विश्वचषक २०२१ मध्ये भारताला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे आणि साहजिकच या सामन्यात सर्वांच्या नजरा कर्णधार विराट कोहलीवर असतील. फलंदाज म्हणून विराट कोहलीची कामगिरी गेल्या काही दिवसात फारशी चांगली राहिलेली नाही, पण तो पाकिस्तानविरुद्ध मोठी खेळी खेळण्याचा आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावण्याचा प्रयत्न करताना दिसेल.

विराट कोहलीची पाकिस्तानविरुद्ध टी२० मध्ये अतिशय दमदार कामगिरी राहिली आहे, आणि जर विराट कोहली मागील सामन्यांप्रमाणेच खेळला तर तो पुन्हा एकदा पाकिस्तानसाठी मोठी समस्या बनू शकतो.

टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत एकूण ६ सामने खेळले आहेत. यात त्याने सहा सामन्यांच्या सहा डावांमध्ये ८४.६६ च्या सरासरीने सुमारे २५४ धावा केल्या आहेत. त्याने पाकिस्तानविरुद्ध सहा सामन्यांत दोन अर्धशतके झळकावली आहेत आणि या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट ११८.१९ इतका राहिला आहे.

विराट कोहली टी२० विश्वचषकात भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू राहिला आहे. विराटने टी२० विश्वचषकात १६ सामन्यात ९ अर्धशतकांच्या मदतीने ७७७ धावा केल्या आहेत. टी२० विश्वचषकात त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ८९ आहे. विराट कोहलीने सलग तीन टी२० विश्वचषकांमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे. त्याने हे अद्भुत काम २०१२, २०१४ आणि २०१६ मध्ये केले होते.

सन २०१२ मध्ये विराट कोहलीने १८५ धावा केल्या होत्या, तर २०१४ मध्ये ३१९ धावा आणि २०१६ मध्ये २७३ धावा केल्या होत्या. विराट भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत टी २० विश्वचषक स्पर्धेत अव्वल स्थानी राहिला आहे.

दुसरीकडे, भारतीय संघाने सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लडला हरवले आहे. टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने ही एक सकारात्मक गोष्ट मानली जात आहे. पण भारतीय संघात सहाव्या गोलंदाजाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजी न करण्यामुळे संघात असमतोल वाढल्याचे बोलले जात आहे. अशात शार्दूल ठाकूरला खेळवण्याबाबत विचार केला जाऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

पाकिस्तानविरुद्ध रोहितची कामगिरी आहे चिंताजनक, टी२० क्रिकेटमध्ये १०० धावाही आल्या नाही करता

‘नेट गोलंदाज म्हणून निवड होणे ही प्रगती नाही तर अधोगती’, आवेश खानच्या वडिलांनी व्यक्त केली नाराजी

ठरलं तर! भारत – इंग्लंड पाचव्या कसोटीला ‘या’ दिवशी होणार सुरुवात, इंग्लंड बोर्डाची घोषणा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---