---Advertisement---

वडिलांच्या आठवणीने आजही विराट होतो भावूक; म्हणाला, ‘आज ते इथे असते तर..’

---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका ४ ऑगस्टपासून नॉटिंगहॅम मध्ये सुरू होणार आहे. ही मालिका सुरू होण्याआधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली स्काय स्पोर्ट्ससाठी समालोचन करणाऱ्या दिनेश कार्तिकला दिलेल्या मुलाखतीत मोकळेपणाने बोलताना दिसून आला.

यामध्ये विराटने आपल्या वडिलांशी असलेले नाते, अनुष्कासोबतची पहिली भेट या सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे. या मुलाखतीशी संबंधित एक टीझर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत कार्तिकने लिहिले की,‘ हा आठवडा किती चांगला असेल. क्रिकेटचा सुपरस्टार होण्यापासून ते वडील होण्यापर्यंत, त्याचे आयुष्य, नेतृत्व आणि प्रेम याबद्दल बोलणे झाले. परंतु, कार्तिकने विराटची ही पूर्ण मुलाखत कधी सोशल मीडियावर येईल हे सांगितले नाही.

वडिलांच्या संबंधित प्रश्नावर कोहली म्हणाला की, ‘माझ्या वडिलांनी मला भारतासाठी खेळताना पाहिले नाही. पण आता माझ्या मुलीबरोबर मला खेळताना पाहून माझ्या आईच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, जर ते इथे असते तर काय झाले असते.’

कोहलीच्या वडिलांचे निधन २००६ मध्ये झाले आहे. तेव्हा तो दिल्लीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत होता. काही वर्षांनंतर त्याने भारतीय संघात पदार्पण केले.

या मुलाखतीचा टीझर जो कार्तिकने शेअर केला आहे. यामध्ये कोहलीने अनुष्का शर्मासोबतच्या पहिल्या भेटीशी संबंधित गोष्टीचाही खुलासा केला आहे. तो म्हणाला की, ‘मी सुरुवातीपासूनच अनुष्कासोबत मस्ती मजा करायचो. मी असे पहिल्यांदाच पहिले होते की , कोणीतरी अशी मस्ती करत होते, जे मी माझ्या बालपणात अनुभवलेली होती आणि हेच खरं कारण आहे ज्यामुळे आमच्या नात्यात इतका चांगला बाँडिंग आहे.’

विराट आणि अनुष्का शर्मा यांनी अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१७ मध्ये इटलीमध्ये लग्न केले होते. यावर्षी जानेवारीमध्ये विराट आणि अनुष्काला कन्यारत्न प्राप्त झाले आहे.

तो पुढे म्हणाले की, ‘इंग्लंडमध्ये मालिका जिंकणे भारतीय क्रिकेट संघासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही या अगोदरही इंग्लंड विरुद्ध असे केले आहे. पण त्याचा माझ्या दृष्टीकोनातून फारसा अर्थ नाही. जरी आम्ही कसोटी सामन्यात पराभूत झालो, तरी मी विजयासाठीच मैदानात उतरणार आहे. मी माझे शस्त्र खाली ठेवणार नाही. वैयक्तिक विक्रमांनी मला काही फरक पडत नाही. मी जर विक्रमांसाठी खेळलो असतो, तर मी माझ्या कारकीर्दीत जे मिळवले आहे त्याच्या निम्मेही मला साध्य करता आले नसते.’

साल २०१८ मध्ये इंग्लंड दौऱ्यात विराटने शानदार फलंदाजी केली होती. विराट त्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा होता. त्या मालिकेत त्याने ५ कसोटीत ५९.३० च्या सरासरीने ५९३ धावा केल्या. याने उत्कृष्ट फलंदाजी करत दोन शतके आणि तीन अर्धशतके झळकावली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

याला म्हणतात धमाकेदार पदार्पण! हंगामातील पहिल्याच चेंडूवर ‘या’ गोलंदाजाने घेतली विकेट

टोकियो ऑलिंपिक्स: सोशल मीडियावर व्हायरल होणारी ‘ही’ देखणी मुलगी आहे तरी कोण? वेधलंय सर्वांचं लक्ष

अगग… स्ट्राईकवरील फलंदाजानेच नॉन स्ट्राईकवरील जोडीदाराला केले ‘रनआऊट’! बघा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---