भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर चाहत्यांशी गप्पा मारल्या होत्या. चाहत्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना कोहलीने दिलखुलास उत्तरे दिली होती. याच दरम्यान त्याला त्याचा डायट प्लॅन काय असतो, हे देखील एका चाहत्याने विचारले होते.
या प्रश्नाचे उत्तर देतांना कोहलीने आपल्या डायट प्लॅनमध्ये अंड्याचा समावेश असतो, असा उल्लेख केला होता. मात्र त्यावरून सोशल मिडीयावर गेले काही दिवस ट्रोल करण्यात येते आहे. मात्र आता या ट्रोलिंगला कोहलीने सडेतोड उत्तर दिले आहे.
कोहलीने दिले सडेतोड प्रत्युत्तर
काही दिवसांपूर्वी एका चाहत्याने कोहलीला त्याचा डायट प्लॅन काय असतो, असे विचारले होते. ज्याचे उत्तर देतांना कोहलीने खूप, सार्या भाज्या, काही अंडे, दोन कप कॉफी, डाळ, किनोआ, पालक, डोसा अशा सगळ्या गोष्टींचा आपल्या डायटमध्ये समावेश असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र यातील अंड्याच्या उल्लेखानंतर सोशल मिडीयावर लोकांनी कोहलीला ट्रोल करायला सुरुवात केली. कोहली व्हिगन असून पण अंडे कसे खातो, असा प्रश्न काही जणांनी उपस्थित केला.
मात्र या प्रश्नावर शांत बसेल तो कोहली कसला. त्याने लगेचच ट्विट करत या ट्रोलर्सना जोरदार प्रत्युत्तर दिले. कोहली म्हणाला, “मी कधीच व्हिगन असल्याचा दावा केला नाही. मी कायमच व्हेजिटेरीयन असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे एक दीर्घ श्वास घ्या आणि तुमच्या भाज्या खा. (अर्थात तुमची इच्छा असेल तर)” अशा शब्दांत प्रत्युत्तर देत कोहलीने ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.
I never claimed to be vegan. Always maintained I'm vegetarian. Take a deep breath and eat your Veggies (if you want 😉)💪😂✌️
— Virat Kohli (@imVkohli) June 1, 2021
कोहली सध्या विलगीकरणात
दरम्यान, विराट कोहली सध्या मुंबईत एका हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी चौदा दिवसांचे विलगीकरण पूर्ण करणे बंधनकारक असल्याने कोहलीसह भारतीय संघातील सगळेच खेळाडू मुंबईतील या हॉटेलमध्ये आहेत. ३ जूनला संपूर्ण संघ इंग्लंडसाठी रवाना होईल. या दौऱ्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सर्वप्रथम विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. त्यानंतर इंग्लंड संघाशी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन हात करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
टेनिस जगतात खळबळ, १५ हजार डॉलरचा दंड ठोठावताच अव्वल महिला टेनिसपटूची ग्रँडस्लॅममधून माघार
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात भुवनेश्वर कुमारची जागा घेऊ शकतात ‘हे’ ३ गोलंदाज
WTC फायनल: ‘रोहित खेळला तर द्विशतक करुनचं शांत बसेल,’ दिग्गजाला आहे विश्वास