यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) फायनल सामना आज (29 जून) रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये खेळला गेला. बार्बाडोसच्या मैदानावर हा सामना रंगला होता. भारतानं रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली 11 वर्षांनंतर आयसीसीच्या ट्राॅफीवर नाव कोरण्याचा इतिहास रचला. परंतू यादरम्यान भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीनं (Virat Kohli) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा जाहीर केली.
यंदाचा टी20 विश्वचषक सुरु झाल्यापासून विराट कोहलीची फलंदाजी शांत होती. त्याच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर अनेकवेळा ट्रोल करण्यात आले परंतू फायनल सामन्यात त्यानं त्याच्या फलंदाजीची धार दाखवत सर्वांना दाखवून दिलं की, तो एक मोठ्या मॅचचा खेळाडू आहे. कोहलीनं या फायनल सामन्यात 59 चेंडूत 76 धावांची खेळी खेळली. यादरम्यानं त्यानं 6 चौकार आणि 2 खणखणीत षटकार ठोकले आणि भारताला सामना जिंकून दिला.
विराट कोहलीला या सामन्याचा सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सामनावीर पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना त्यानं यंदाचा टी20 विश्वचषक शेवटचा असल्याची घोषणा केली. कोहली टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. ही चाहत्यांसाठी टी20 विश्वचषक जिंकल्याचा आनंद एकीकडे तर विराट कोहली टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्याचं दु:ख दुसरीकडे.
विराटनं त्याच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये 125 सामने खेळले त्यामध्ये त्यानं 4188 धावा ठोकल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 137.04 राहिला. त्याच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये त्यानं 1 शतक तर 38 अर्धशतक ठोकले.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियानं करून दाखवलं, 11 वर्षानंतर कोरलं आयसीसी ट्राॅफीवर नाव…!!!
जेव्हा मॅटर मोठा असतो, तेव्हा फक्त विराट उभा असतो! फायनलमध्ये पुन्हा एकदा दिसला ‘किंग कोहली’चा जलवा
कोहलीनं वाचवली भारतीय संघाची इज्जत! आफ्रिकेसमोर 177 धावांचं आव्हान