रविवारी (21 आॅक्टोबर) भारत विरुद्ध विंडीज संघात पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्माने केलेल्या शतकाच्या जोरावर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.
यावेळी या सामन्यानंतर विराटने ‘खूप थोडे वर्ष बाकी आहेत खेळण्यासाठी’असे भाष्य केल्याने विराट निवृत्ती घेणार की काय यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. म्हणूनच याबाबतची भूमिका त्याचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी स्पष्ट केली आहे.
विंडीज विरुद्धच्या सामन्यानंतर विराट म्हणाला, ‘क्रिकेटची मजा घेण्यासाठी माझ्या कारकिर्दीतील आता खूप थोडे वर्ष बाकी आहेत. देशासाठी खेळणे ही गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. तूम्ही कोणत्याही खेळाला सहज असल्यासारखे घेऊ शतक नाही.’
“मला नाही वाटत त्याला कमी वर्ष म्हणायचे होते. तुम्ही त्याला आणखी पुढील दहा वर्षे खेळताना बघू शकता. तो वयाच्या 40व्या वर्षांच्या आत निवृत्ती घेणार नाही हे नक्की आहे. कारण त्याची धावांची भुक अजून संपली नाही. तसेच त्याला कोणतीही दुखापत नसून तो पुढील दहा वर्षे खेळणार हे निश्चित आहे”, असे शर्मा म्हणाले.
विराटला मानेची दुखापत झाल्याने त्याने काऊंटी क्रिकेटमधून माघार घेतली होती. तसेच त्यावेळी भारताला इंग्लंडकडून कसोटी क्रिकेट मालिकेत 1-4 असे पराभूत व्हावे लागले होते.
तसेच विराटला एशिया कपमधूनही आराम दिला होता. यावेळी भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एशिया कप जिंकला होता.
सध्या सुरू असलेल्या विंडीज विरुद्धच्या पाच सामन्याच्या वनडे मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. तेथे संघ 3 टी-20, चार कसोटी सामने आणि 3 वनडे सामने खेळणार आहे. ही मालिका 2019ला इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी महत्त्वाची असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–८० वर्षांचा धोनी व्हिलचेअर असेल तरी त्याला माझ्या संघात खेळव
–गांगुली फॅन्सचे टेन्शन वाढले, विराटकडून हा विक्रम किरकोळीत मोडला जाणार
–आज प्रो कबड्डीत होणार विक्रमांची बरसात; अजय ठाकूर, राहुल चौधरी सज्ज