भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एक मोठा खुलासा केला आहे. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीबरोबरच्या लाईव्ह इंस्टाग्राम लाईव्ह चॅटदरम्यान बोलताना विराट म्हणाला की, एकेकाळी राज्यस्तरीय संघात निवड होण्यासाठी माझ्या वडिलांकडून पैसे मागितले होते.
विराट (Virat Kohli) म्हणाला की, “तो चांगला खेळत होता. राज्यस्तरीय क्रिकेटमध्ये एकदा कोणीतरी पुढे आले आणि वडिलांना म्हटले की, निवड करण्यात काही समस्या नाही. परंतु यासाठी त्यांना काहीतरी अतिरिक्त म्हणजेच पैसे द्यावे लागतील. त्यांना काय हवे आहे हे समजत होते. परंतु त्याचे वडील मेहनत करून वकील बनले होते तसेच मेहनत करणाऱ्यांना ही भाषा समज नाही.”
“वडिलांनी प्रशिक्षकाला स्पष्टपणे सांगितले होते की, स्वत:च्या हिंमतीवर माझा मुलगा जे काही करेल ते ठीक आहे. परंतु अशाप्रकारे खेळणार नाही. त्यावेळी मी खूप रडलो होतो. परंतु वडील म्हणाले होते की, ते कर जे इतर लोक करू शकत नाहीत. त्यांचे ते शब्द मी नेहमी लक्षात ठेवले,” असेही विराट पुढे म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-नेटिझन्सकडून भज्जी- युवीचा समाचार! भज्जी म्हणतोय, आम्ही तर त्याला मित्र समजत होतो
-स्वतःच्याच होम ग्राउंडवर प्रेक्षकांनी उडवली होती हुर्ये, कारण…
-विराट म्हणतो, फक्त आणि फक्त ‘याच’ व्यक्तीमुळे माझा फिटनेस झाला टाॅप