---Advertisement---

व्हिडिओ: …म्हणून कर्णधार कोहलीने मागितली स्टिव्ह स्मिथची माफी, जाणून घ्या कारण

On: सोमवार, जून 10, 2019 11:48 AM
---Advertisement---

लंडन। रविवारी(9 जून) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडलेला 2019 विश्वचषकातील 14 वा सामना भारताने 36 धावांनी जिंकला. हा भारताचा या विश्वचषकातील सलग दुसरा विजय आहे. या सामन्यात भारताने मिळवलेल्या विजयाबरोबरच भारताचा कर्णधार विराट कोहलीने स्टिव्ह स्मिथसाठी दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे सर्वांनी कौतुक झाले आहे.

द ओव्हलवर पार पडलेल्या या सामन्यात विराट फलंदाजी करत असताना एका वेळी स्मिथ बाउंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी चाहत्यांकडून स्मिथची निंदा केली जात होती.

ते पाहून विराटने व्हॉक्सहॉल एन्डला मोठ्याप्रमाणात उपस्थित असणाऱ्या भारतीय चाहत्यांच्या दिशेने टाळ्या वाजवण्यासारखे हातवारे करुन स्मिथची निंदा करण्याऐवजी त्याचे कौतुक करण्यास सांगितले होते. विराटची ही खिलाडूवृत्ती पाहून स्मिथनेही विराट जवळ येऊन त्याच्याशी हात मिळवला होता.

विराटने त्याच्या या खिलाडूवृत्तीबद्दल सामना संपल्यानंतर बोलताना त्याने स्मिथची निंदा करणाऱ्या भारतीय चाहत्यांच्या वतीने माफी मागितल्याचा खूलासा केला आहे.

विराट म्हणाला, ‘मला वाटते जे झाले ते झाले. आता त्याला बरेच दिवस झाले आहेत. त्याने(स्मिथ) पुनरागमन केले आहे. तो त्याच्या संघासाठी चांगले खेळत आहे. मी आयपीएलमध्येही त्याला पाहिले आहे. मैदानात कोणाला असे निराश पाहून चांगले वाटत नाही.’

‘आमच्यामधे मागे याआधी मैदानात काही वाद झाले होते. पण प्रत्येकवेळी तो जेव्हा खेळण्यासाठी उतरतो तेव्हा त्याला अशा गोष्टींचा सामना करताना पहाणे चांगले वाटत नाही.’

तसेच विराट पुढे म्हणाला, ‘तो(स्मिथ) परत आला आहे. त्याने मेहनत घेतली आहे. तो त्यांच्या संघासाठी खेळत आहे. इथे मोठ्या प्रमाणात भारतीय चाहते असल्याने त्यांनी अशा प्रकारचे(स्मिथची निंदा करण्यासारखे) कोणतेही वाईट उदाहरण जगासमोर ठेवू नये असे मला वाटत होते वाटत होते. कारण माझ्या मताप्रमाणे त्याने असे काहीही केले नाही, ज्यामुळे त्याची निंदा केली जावी.’

‘तो फक्त क्रिकेट खेळत आहे. जर मी त्या जागेवर असतो, जर माझ्याबरोबर असे काही झाले असते आणि मी त्याचा स्विकार करुन जर त्याबद्दल माफी मागितली असती, तसेच मी त्यानंतर पुनरागमन केले असते आणि तरीही जर माझी निंदा केली जात असेल. तर मला ते आवडणार नाही.’

‘त्यामुळे मला स्मिथचे वाईट वाटले. मी त्याची भारतीय चाहत्यांच्या वतीने माफी मागितली कारण मी याआधीच्या सामन्यातही असे प्रकार झाल्याचे मी पाहीले आहे.’

https://twitter.com/cricketworldcup/status/1137806982235267073

स्मिथ आणि त्याचा संघ सहकारी डेव्हिड वॉर्नर मागील वर्षी मार्चमध्ये चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळले होते. त्यामुळे त्यांच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 1 वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी बंदी घातली होती. पण त्यांची ही बंदी मार्च 2019मध्ये संपली असल्याने या दोघांनीही 2019 विश्वचषकातून ऑस्ट्रेलिया संघात पूनरागम केले आहे.

मात्र या दोघांनाही बंदीची शिक्षा पूर्ण केल्यानंतरही चाहत्यांकडून होत असलेल्या निंदेला सामोरे जावे लागत आहे. भारताविरुद्धच्या सामन्याआधीही स्मिथ आणि वॉर्नरची चाहत्यांनी चेंडू छेडछाड प्रकरणामुळे खिल्ली उडवली आहे.

https://twitter.com/ICC/status/1137777943667707907

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

कोहलीची खिलाडूवृत्ती! स्मिथची निंदा करण्याऐवजी चाहत्यांना सांगितले कौतुक करा, पहा व्हिडिओ

‘लाल मातीचा बादशहा’ राफेल नदालने जिंकले १२ व्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद

विश्वचषक २०१९:…आणि बुमराहच्या बॉलवर डेव्हिड वॉर्नर आउट होता होता वाचला!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment