---Advertisement---

जेव्हा विराट कोहलीने सांगितले होते, ‘जडेजा आहे सर्वात खोटारडा व्यक्ती’; जुना व्हिडिओ होतोय व्हायरल

On: मंगळवार, मे 25, 2021 11:34 PM
---Advertisement---

आगामी काळात भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वात जवळजवळ तीन महिने इंग्लंड दौर्‍यावर असणार आहे. भारतीय संघ 2 जूनला मुंबईहून इंग्लंडकडे रवाना होईल. सध्या भारतीय संघात निवड झालेले सर्व 20 खेळाडू मुंबईतील हॉटेलमध्ये कडक क्‍वारंटाइनमध्ये आहेत. या सर्व प्रक्रिये दरम्यान, भारतीय कर्णधार विराट कोहलीचा एक जुना मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत असून, चाहते या व्हिडिओला मोठ्याप्रमाणात पसंद करत आहेत.

वायरल होत असलेला व्हिडिओ कॉमेडी नाइट्स विथ कपिल या प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रमाचा आहे. ज्यामध्ये विराट कोहलीला काही वर्षांपूर्वी आमंत्रित करण्यात आले होते. या व्हिडिओमध्ये विराट कोहली भारतीय संघाच्या खेळाडूंचे काही मजेशीर किस्से सांगत आहे.

या कार्यक्रमा दरम्यान कपिल शर्माने विराट कोहलीला अनेक मजेशीर प्रश्न विचारले. विराटने देखील या सर्व प्रश्नांची प्रामाणिक उत्तर देण्याचा प्रयत्न केला. कपिलने विराटला विचारले की भारतीय संघात सर्वाधिक खोटे बोलणारा खेळाडू कोण आहे? यावर विराट कोहलीने थोडाही वेळ न दवडता अष्टपैलू रवींद्र जडेजाचे नाव घेतो. विराटने सांगितले की, जडेजाकडे अनेक प्रकारची अतरंगी माहिती असते, जी ऐकून आपण हसू थांबवू शकत नाही.

विराट म्हणाला, “जाडेजा जामनगरमध्ये राहतो, त्याच्याशी जामनगरबद्दल माहिती विचारली असता, तो म्हणतो की, दोन इमारती आहेत त्या तांदळाच्या आकाराने जवळ जवळ येत आहेत. जेव्हा त्या एकत्र येतील तेव्हा जगाचा नाश होईल.” विराटने आणखी एक किस्सा सांगिताना म्हणाला की, “तो ( जडेजा) म्हणतो जामनगरच्या राजाची घोड्यावर बसणारी मूर्ती आहे, यात घोड्याचे दोन पाय आकाशाकडे गेलेले आहेत. आणि दरवर्षी घोड्याच्या पायांची दिशा बदलते.”

Cricket Special |Comedy Nights With Kapil | When England Women's Cricket Team Captain Proposed Virat

दरम्यान, या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान चाहऱ्यांचे प्रचंड मनोरंजन झाले होते. त्यामुळेच या भागाचे व्हिडिओ कायम सोशल मीडियावर वायरल होत असतात.

महत्त्वाच्या बातम्या –

अन् कपड्यानिशी शॉवर घ्यायला गेला रसल, तीन वर्षापूर्वीच्या ‘त्या’ घटनेचा केला उलगडा

बायको ती बायकोच! ‘या’ खेळाडूच्या पत्नीने चेहरा पाहून ओळखले तो आहे कोरोनाबाधित

योगा ते डम्बेल्स! भारतीय खेळाडू बायो बबल मध्ये ‘असा’ जपत आहेत फिटनेस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---