भारत आणि श्रीलंका (Ind vs SL Test Series) यांच्यातील कसोटी मालिका शुक्रवारी (४ मार्च) सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये खेळला जात आहे. माजी कर्णधार विराट कोहली याच्यासाठी हा सामना खास आहे, कारण कसोटी कारकिर्दीतील हा त्याचा १०० वा सामना आहे. सामना सुरू होण्यापूर्वी विराटने अनेक विषयांवर मत मांडले आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने अनेक सामने जिंकले आहेत आणि संघासोबतच्या या प्रावासामुळे तो खूप खुश आहे.
विराट कोहलीने कसोटी संघाची कमान सांभाळण्यापूर्वी भारतीय संघ कसोटी क्रमवारीत सातव्या क्रमांकावर होता. कसोटी कर्णधारपद सोडण्यापूर्वी भारतीय संघाला त्याने सलग पाच वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर कायम ठेवले होते. आता रोहित शर्मा नवीन कसोटी कर्णधार बनला असून विराटने केलेली चांगली कामगिरी पुढे कायम राखण्याचे आव्हान त्याच्यापुढे आहे.
बीसीसीआयला एक खास मुलाखत देताना विराट कोहली अनेक मुद्यांवर व्यक्त झाला आहे. तो म्हणाला की, “मला चांगले आठवते की, जेव्हा मी कसोटी कर्णधारपद सांभाळले, माझा संघाप्रती एक वेगळा दृष्टिकोन होता आणि आम्ही पाच वर्षांपर्यंत सतत पहिल्या क्रमांकावर होतो. मला या कामगिरीवर अभिमान आहे. २०१५ ते २०२० दरम्यान आम्ही ज्याप्रकारेचे क्रिकेट खेळले, ते खास आहे. आम्ही काही अवघड सामने गमावले आणि अप्रतिम पुनरागमन केले. मला या संपूर्ण प्रवासाबद्दल अभिमान आहे.”
'I never thought i'll play 100 Test matches. It has been a long journey. Grateful that i've been able to make it to 100' – @imVkohli on his landmark Test.
Full interview coming up on https://t.co/Z3MPyesSeZ. Stay tuned! #VK100 pic.twitter.com/SFehIolPwb
— BCCI (@BCCI) March 3, 2022
दरम्यान, एमएस धोनीने २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि विरोट कोहलीवर ही जबाबदारी सोपवली गेली होती. २०१४ नंतर भारताने विराटच्या नेतृत्वात ६८ कसोटी सामने खेळले आणि यापैकी ४० सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवला. १७ सामन्यात भारतीय संघाने पराभव पत्करला, तर ११ सामने अनिर्णीत राहिले. जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये विराट भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. विराटने सर्वात जास्त कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे.