रविवारी(16 जून) आयसीसी 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान संघात ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर पार पडला. या सामन्यात भारताने 89 धावांनी विजय मिळवला. हा भारताचा या विश्वचषकातील हा तिसरा विजय आहे.
या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावर या सामन्यातील एक फोटो आणि त्याच्या लहानपणीचा एक फोटो असा कोलाज फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या फोटोमधे उजव्या बाजूला या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने कंबरेवर हात ठेवून आकाशाकडे बघत असलेला विराटचा फोटो आहे. तर अशाच पोजमध्ये डाव्या बाजूला विराटच्या लहानपणीचा फोटो आहे. हा फोटो शेअर करताना विराटने कॅप्शन दिले आहे की ‘हे 90 च्या दशकाच्या सुरुवातीपासून करत आहे.’
Doing it since the early 90s! 🤓 pic.twitter.com/IVitRHUWpW
— Virat Kohli (@imVkohli) June 17, 2019
विराट या विश्वचषकात चांगल्या लयीत असून त्याने या विश्वचषकात तीन सामन्यात दोन अर्धशतके करताना 177 धावा केल्या आहेत. त्याने ही द्विशतके ऑस्ट्रेलिया विरुद्ध आणि पाकिस्तान विरुद्ध केली आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–इंग्लंड संघाला मोठा धक्का; हा महत्त्वाचा खेळाडू पडला दोन सामन्यांतून बाहेर
–रोहित शर्मा म्हणतो, हा खेळाडू बनू शकतो टीम इंडियाचा कर्णधार, पहा व्हिडिओ
–विंडीज विरुद्ध शतक करणाऱ्या शाकिबने दिग्गज अष्टपैलू खेळाडूंना मागे टाकत रचला विश्वविक्रम