---Advertisement---

विराट कोहली-रोहित शर्मामधील ही खास शर्यत जिंकणार कोण?

On: रविवार, सप्टेंबर 22, 2019 3:35 PM
---Advertisement---

बंगळूरु। आज(22 सप्टेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात एम चिन्नास्वामी स्टेडीयमवर तिसरा आणि शेवटचा टी20 सामना पार पडणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मामध्ये आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरण्यासाठी शर्यत पहायला मिळणार आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा विराटच्या नावावर आहेत. त्याने 18 सप्टेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी20 मध्ये नाबाद 72 धावांची खेळी करत हा अव्वल क्रमांक मिळवला होता. विशेष म्हणजे त्याने रोहितला मागे टाकत हा विश्वविक्रम केला होता.

विराटच्या सध्या आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 71 सामन्यात 2441 धावा आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या रोहितच्या 97 सामन्यात 2434 धावा आहेत. या दोघांमध्ये केवळ 7 धावांचे अंतर आहे.

विराटच्या या विश्वविक्रमाची बरोबरी करण्याचीही रोहितला संधी – 

याबरोबरच आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिकवेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजांमध्येही विराट अव्वल तर रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे.

विराटने आत्तापर्यंत 22 वेळा आणि रोहितने 21 वेळा आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे या सामन्यात विराटच्या या विश्वविक्रमाची बरोबरी करण्याची रोहितला संधी आहे.

#आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

2441 धावा – विराट कोहली (71 सामने)

2434 धावा – रोहित शर्मा (97 सामने)

2283 धावा – मार्टिन गप्टिल (78 सामने)

2263 धावा – शोएब मलिक (111 सामने)

2140 धावा – ब्रेंडन मॅक्यूलम (71 सामने)

#आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिकवेळा 50+ धावांची खेळी करणारे क्रिकेटपटू –

22 – विराट कोहली (71 सामने)

21 – रोहित शर्मा (97 सामने)

16 – मार्टिन गप्टिल (78 सामने)

15 – ख्रिस गेल (58 सामने)

15 – ब्रेंडन मॅक्यूलम (71 सामने)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

केवळ ३ भारतीयांचा समावेश असणाऱ्या या यादीत सामील होण्यासाठी धवन केवळ ४ धावा दूर

टीम इंडियाच्या टी२० संघात संधी न मिळाल्याबद्दल कुलदीप यादव म्हणाला…

धोनी की पॉटिंग, कोण आहे आवडता कर्णधार? ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाने दिले हे उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment