भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली क्रिकेट व्यतिरिक्त अन्य घटनांमुळे देखील नेहमी चर्चेत असतो. अनुष्का शर्मासह लग्न होण्यापूर्वी त्याचे अनेक मुलींशी नाव जोडलेही गेले होते. त्याच्याबद्दल नेहमीच विविध चर्चा आणि अफवा पसरत असतात. असाच एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये विराट आपल्या एका ‘ डेट’ विषयी बोलताना दिसून येतोय. परंतु, आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोहलीची ती डेट 5 मिनिटे देखील चालली नव्हती आणि त्याला तिथून पळ काढावा लागला होता.
‘डेट’ सोडून का पळाला विराट कोहली?
या व्हिडिओत विराट एका महिला वार्ताहरासोबत आपल्या एका ‘डेट’ संदर्भात बोलताना दिसून येत आहे. वार्ताहराने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतांना विराटने सांगितलं की, ‘मी एका डेटवर गेलो होतो, परंतु ती डेट फक्त 5 मिनिटे चालली. कारण ती मुलगी दिसायला फारशी चांगली होती. ती मुलगी अजिबात सुंदर नव्हती त्यामुळे मी तिथून पळून आलो.’
5 मिनिटे देखील नव्हती चालली कोहलीची डेट:
महिला वार्ताहराने कोहलीला त्याच्या आतापर्यंतच्या सर्वात जलद डेटविषयी प्रश्न केला. त्याला उत्तर देतांना कोहली म्हणाला की, ‘माझी सर्वात जलद डेट एक “ब्लाइंड डेट” होती. पंरतु, ती फक्त 5 मिनिटेच चालली होती, इतक्या लवकर डेट संपली, कारण ती मुलगी खूपच जास्त कुरूप होती, ज्यामुळे मी तिथून पळ काढला.’ या व्हिडिओच्या वेळी विराट खूपच तरुण होता.
तब्बल 4 महिने भारतीय संघ असेल इंग्लंड दौऱ्यावर:
सध्या विराट भारतीय संघाचा कर्णधार असून इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 18 ते 22 जून दरम्यान न्यूझीलंड संघाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. भारतीय संघ जवळपास 4 महिने इंग्लंड दौऱ्यावर असेल, न्यूझीलंड विरुद्धच्या अंतिम सामन्यानंतर भारत 4 ऑगस्ट पासून यजमान इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
साउथम्प्टन पोहोचला भारतीय संघ :
भारतीय संघ खेळाडू आपापल्या कुटुंबियांसोबत साऊथम्प्टन पोहोचले असून सध्या हॉटेलमध्ये विलगिकरनात आहेत.आयपीएल हंगाम स्थगित झाल्यावर भारतीय खेळाडूंनी आपापल्या कुटुंबियांसोबत आपला वेळ घालवला असून आता पुन्हा ते मैदानावर उतरण्यास सज्ज झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
केकेआरला तगडा धक्का! ‘हा’ मॅचविनर खेळाडू खेळणार नाही आयपीएलचा उर्वरित हंगाम
ब्रॅडमन यांना १०० ची सरासरी ठेवण्यापासून रोखणारे एरिक हॉलिस, कारकिर्दीत मिळवले तब्बल २३२३ बळी
आयसीसीने घातलेली २ वर्षांची बंदी पूर्ण करुन सनथ जयसुर्या ‘या’ संघाचे प्रशिक्षकपद सांभाळण्यास सज्ज