न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसत आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांचा फ्लॉप फलंदाजी शो पाहायला मिळाला. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली देखील छोटेखानी खेळी खेळून अत्यंत दुर्दैवीरित्या बाद झाला. महत्त्वाचे म्हणजे, कोहली त्याच्या कसोटी कारकिर्दीच्या 200व्या डावात आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 600व्या डावात धावबाद झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात कोहलीने स्वतःच्या चुकीमुळे आपली विकेट गमावली.
खराब फॉर्मशी झगडत असलेल्या विराटने 6 चेंडूंचा सामना करत 4 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपण्यापूर्वीच मॅट हेन्रीने केलेल्या शानदार थ्रोने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. वाईट गोष्ट म्हणजे चेंडू जास्त दूर गेला नसतानाही कोहली स्वतः धाव घेण्यासाठी पळाला. शेवटी त्याने डाईव्ह मारत धाव पूर्ण करण्याचाही प्रयत्न केला, पण तो चुकला.
कोहलीने रचिन रवींद्रने फेकलेला चेंडू मिड-ऑनच्या दिशेने हलकासा मारला. यानंतर तो लगेचच एक धाव घेण्यासाठी पळाला. मात्र, त्याला यश मिळू शकले नाही. मॅट हेन्रीने मारलेल्या अचूक थ्रोमुळे कोहली धावबाद झाला. कोहलीच्या विकेटनंतर प्रशिक्षक गौतम गंभीरसह ड्रेसिंग रूममध्ये बसलेले सर्व भारतीय खेळाडूही निराश दिसले. हा कोहलीचा 200 वा कसोटी डाव होता.
Matt Henry’s direct hit catches Virat Kohli short 😯#INDvNZ #IDFCFirstBankTestTrophy #JioCinemaSports pic.twitter.com/cL4RvUdMST
— JioCinema (@JioCinema) November 1, 2024
विराट कोहली कसोटीत
50 वा डाव – 6 धावा वि. इंग्लंड, 2014
100 वा डाव – 13 धावा वि. श्रीलंका, 2017
150 वा डाव – 0 धावा वि. इंग्लंड, 2021
200 वा डाव – 4 धावा वि. न्यूझीलंड, 2024
600 आंतरराष्ट्रीय डावांनंतर सर्वाधिक धावा
27133 – विराट कोहली
26020 – सचिन तेंडुलकर
25386- रिकी पाँटिंग
25212- जॅक कॅलिस
24884- कुमार संगकारा
24097- राहुल द्रविड
21815 – महेला जयवर्धने
19917 – सनथ जयसूर्या
दरम्यान न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोहलीची बॅट शांत राहिली आहे. त्याने आतापर्यंत 3 कसोटीच्या 5 डावात 92 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 1 अर्धशतकही ठोकले आहे. बेंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहलीचे खातेही उघडले नाही. त्याने दुसऱ्या डावात शानदार पुनरागमन करत 70 धावा केल्या. यानंतर भारताच्या माजी कर्णधाराने पुणे कसोटीच्या पहिल्या डावात 1 धाव आणि दुसऱ्या डावात 17 धावा केल्या होत्या.
हेही वाचा –
“कोणीतरी लवकरच पिवळी जर्सी घालेल”, सीएसकेच्या माजी खेळाडूने पंतबाबत दिले मोठे संकेत
मुंबई कसोटीचा पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावे, अखेरच्या सत्रात टीम इंडियाची घसरगुंडी!
5 डावात 100 धावाही नाही! रोहित शर्माला झालंय तरी काय? आकडेवारी फारच खराब