भारत आणि चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) माजी फलंदाज सुरेश रैनाने (Suresh Raina) यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतच्या (Rishabh Pant) सीएसकेमध्ये सामील होण्याबाबत मोठा इशारा दिला आहे. पंतला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2025) च्या मेगा लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने सोडले आहे. त्यामुळे आता या भारतीय स्टारला लिलावात मोठी रक्कम मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
मेगा लिलावापूर्वी पंत सीएसकेमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर रैनाने खुलासा केला की, त्याने अलीकडेच दिल्लीत त्याचा मित्र धोनीची भेट घेतली, जिथे पंत देखील उपस्थित होता. म्हणून, माजी क्रिकेटपटूने पंत सीएसकेमध्ये सामील होण्याच्या शक्यतेचे संकेत दिले आहेत. लवकरच कोणीतरी पिवळी जर्सी परिधान करेल, असे रैना म्हणाला आहे.
‘लवकरच कोणीतरी पिवळी जर्सी घालेल’
याबाबत बोलताना जिओ सिनेमावर सुरेश रैना म्हणाला, “मी दिल्लीत एमएस धोनीला भेटलो, यावेळी पंतही तिथे होता. मला वाटते की काहीतरी मोठे घडणार आहे. लवकरच कोणीतरी पिवळी जर्सी घालेल.”
पंतचा दिल्लीशी संबंध तुटला
नऊ वर्षे दिल्लीकडून खेळल्यानंतर पंत या संघापासून वेगळा झाला आहे. यष्टीरक्षक फलंदाजाने आपल्या संघासाठी 111 सामने खेळले आणि 35.31 च्या सरासरीने आणि 148.93 च्या स्ट्राइक रेटने 3284 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. दिल्ली कॅपिटवल्सने आयपीएल 2025 साठी चार खेळाडूंना रिटेन केले आहे, ज्यात अक्षर पटेल (रु. 16.5 कोटी), अभिषेक पोरेल (रु. 4 कोटी), ट्रिस्टन स्टब्स (रु. 10 कोटी) आणि कुलदीप यादव (रु. 13.5 कोटी) यांचा समावेश आहे. आता त्यांच्या पर्समध्ये 73 कोटी रुपये शिल्लक आहेत.
हेही वाचा –
मुंबई कसोटीचा पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावे, अखेरच्या सत्रात टीम इंडियाची घसरगुंडी!
5 डावात 100 धावाही नाही! रोहित शर्माला झालंय तरी काय? आकडेवारी फारच खराब
रोहित शर्माची पोकळी हा सलामीवीर कशी भरून काढणार? ऑस्ट्रेलियात होतोय पूर्णपणे फ्लॉप!