चेन्नई सुपर किंग्सने शुक्रवारी (२४ सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ६ गडी राखून सहज मात केली. या विजयासह महेंद्रसिंग धोनीचा संघ १४ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. दुसरीकडे, आरसीबीचा संघ ९ सामन्यांमध्ये ५ विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र सीएसकेकडून झालेल्या पराभवानंतर आरसीबीचा विराट कोहली खूप निराश दिसला. त्याने ड्रेसिंग रूममध्ये आरसीबीच्या खेळाडूंशी याबाबत चर्चा केली.
धोनीने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. कर्णधार विराट कोहली (५३) आणि युवा देवदत्त पडिक्कल (७०) यांनी पहिल्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी केली. पण सीएसकेने त्यांच्या गोलंदाजीच्या जोरावर आरसीबीला ६ बाद १५६ धावांवर रोखले.
यानंतर, सीएसकेकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाडने ३८ आणि फाफ डु प्लेसिसने ३१ धावा केल्या. मोईन अलीने १८ चेंडूत २३, अंबाती रायडूने २२ चेंडूत ३२ धावा केल्या. धोनी ११ धावांवर नाबाद राहिला आणि सुरेश रैनानेही नाबाद १७ धावा केल्या. अशाप्रकारे सीएसकेने १८.१ षटकांत ४ बाद १५७ धावा करत आपली विजयी मालिका सुरू ठेवली. सीएसकेचा हा सातवा विजय होता.
कोहलीने आपल्या संघाला सांगितले की, आपल्याला या कामगिरीमुळे खूप वाईट वाटले पाहिजे. सीएसकेविरुद्धची कामगिरी खूप लज्जास्पद राहिली आहे. विराट म्हणाला, ‘आज आपण या पराभवामुळे दुखावले गेले पाहिजे, खरोखरच खूप दुखावले गेले पाहिजे. जेव्हा आपण शीर्षस्थानी असतो आणि आपण खेळ नीट संपवण्याबाबत बोलतो, तेव्हा आपण अशा पद्धतीने खेळून चालत नाही.’
Game Day: RCB vs CSK, Dressing Room Review
Coach Mike Hesson and Captain Virat Kohli address the team after a tough loss against CSK, and identify areas to improve ahead of the all important fixture against MI on Sunday.#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 pic.twitter.com/1vhVt44sU1
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) September 25, 2021
तो पुढे म्हणाला, ‘खेळपट्टी थोडीशी मंदावली होती. पण मला वाटते की, आपण तिथे १५-२० धावा वाचवल्या असत्या. आपण १७५ धावा केल्या असत्या तर जिंकण्याची संधी मिळाली असती. आपण सातत्याने चांगली गोलंदाजी केली नाही. आपण गोलंदाजीत हवे तेवढे धाडस दाखवले नाही. मी खूप निराश आहे. सीएसकेने डावाच्या अखेरीस चांगली गोलंदाजी केली. संथ चेंडू आणि यॉर्कर यांचा चांगला वापर केला.’
महत्त्वाच्या बातम्या-
टी२०त १८७ विकेट्स घेणाऱ्या राजस्थानच्या ‘या’ डावखुऱ्या गोलंदाजाचे ५ वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन
ऑस्ट्रेलियन अंपायरच्या ‘त्या’ निर्णयामुळे भारतीय महिला संघाने गमावला सामना, चाहत्यांची आगपाखड
कोहलीची झटपट डाईव्ह अन् अगदी मैदानालगत टिपला अद्भुत झेल; चाहतेही म्हणाले, ‘चित्त्यापेक्षा जास्त चपळ’