आयपीएल 2023 चा उत्तरार्ध चाहत्यांसाठी बुधवारी (26 एप्रिल) सुरू झाल. हंगामातील 36 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ आमने सामने होते. या सामन्यात केकेआरने शानदार सांघिक खेळ दाखवत 21 धावांनी विजय संपादन केला. एकवेळ हातात असलेला सामना आरसीबीला आपल्या घरच्या मैदानावर गमवावा लागला. त्यानंतर आरसीबीचा कर्णधार विराट कोहली हा चांगलाच नाराज झालेला पाहायला मिळाला.
विराट कोहली मैदानावर असेपर्यंत आरसीबी या सामन्यात पुढे होती. मात्र, तो बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांनी नांग्या टाकल्या. परिणामी, संघाला 21 धावांनी पराभूत व्हावे लागले. सामन्यानंतर बोलताना विराट म्हणाला,
“खरे सांगायचे झाले तर आम्ही त्यांना हा सामना बहाल केला आहे. आम्ही सामना गमावण्यास पात्र होतो. जर तुम्ही आमचा खेळ बघितला तर, आम्ही मिळालेल्या संधींचा फायदा घेतला नाही. आम्ही काही संधी सोडल्या ज्यामुळे आम्हाला 25-30 अतिरिक्त धावा द्याव्या लागल्या. विकेट गमावूनही आम्हाला एका भागीदारीची गरज होती.”
या सामन्याचा विचार केल्यास विराट कोहलीने नाणेफेक जिंकून केकेआरला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. केकेआरला जेसन रॉय व जगदीसन यांनी 83 धावांची सलामी दिली. रॉयने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर कर्णधार राणा, व्यंकटेश अय्यर व रिंकू सिंग यांनी दिलेला उपयुक्त योगदानाच्या जोरावर केकेआरने 200 धावा उभ्या केल्या. या धावांचा पाठलाग करताना आरसीबीला पावर प्लेमध्ये तीन झटके बसले. कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक करत झुंज दिली. त्यानंतर खालच्या फळीतील फलंदाज अपेक्षित कामगिरी करू नसल्याने आरसीबीला पराभव पत्करावा लागला. केकेआरसाठी वरूण चक्रवर्तीने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
(Virat Kohli Said We Deserve To Lose After Defeat Against KKR At Chinnaswamy Stadium)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आता विराट धावा करण्यासाठी झगडणार…’, एका वक्तव्यामुळे अनन्या पांडे ट्रोल
RCBvsKKR । विजयकुमार वैशाकच्या घातक यॉर्करवर केकेआरचा सेट खेळाडू त्रिफळाचीत । पाहा VIDEO