---Advertisement---

विराट कोहली म्हणतो, विश्वचषक जिंकण्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट करावी लागेल

On: रविवार, जानेवारी 27, 2019 3:09 PM
---Advertisement---

न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताने 90 धावांनी विजय मिळवत 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने विश्वचषक जिंकण्यासाठी संघाला अजून चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता आहे, असे मत मांडले आहे.

“सध्या संघ उत्तम कामगिरी करत आहे. मात्र जर विश्वचषक जिंकायचा असेल तर मधल्या षटकांमध्ये अधिक धावा करण्याची गरज आहे”, असे विराट न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यानंतर म्हणाला.

यावर्षीच्या मे महिन्यात आयसीसी विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने भारतासाठी न्यूझीलंड विरुद्धची ही मालिका महत्त्वाची आहे. ही विश्वचषक स्पर्धा इंग्लंड आणि वेल्स येथे 30मे पासुन सुरू होणार आहे.

“रोहित शर्मा आणि शिखर धवन हे संघाला चांगली सुरूवात करून देतात. पण मी 34-40 षटकापर्यंत खेळून बाद झालो तर नवीन फलंदाजाला जम बसायला काही वेळ लागतो. या विभागात आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे”, असेही विराट म्हणाला.

विराटने यावेळी फिरकीपटू गोलंदाज कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या दोघांचेही कौतुक केले.

“कुलदीप आणि चहल यांनी उत्तम कामगिरी करत संघाच्या विजयामध्ये महत्त्वाची भुमिका निभावली आहे”, असे विराट म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या-

नेपाळच्या या १६ वर्षीय युवा क्रिकेटपटूने मोडला सचिन तेंडुलकरचा २९ वर्षीय जूना विक्रम

संपूर्ण यादी: गौतम गंभीर, सुनील छेत्रीसह या भारतीय खेळाडूंची २०१९ पद्म पुरस्कारांसाठी झाली निवड

केवळ ३७ सामने खेळणाऱ्या कुलदीप यादवचा झाला तेंडुलकर-कुंबळे या दिग्गजांच्या यादीत समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment