भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज (18 जून)पासून साउथैम्प्टन विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्याच्या एक दिवस अगोदर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्हर्च्युअल पत्रकार परिषदेमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. दरम्यान त्याने संघाच्या रणनितीविषयीही भाष्य केले.
विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम साउथम्प्टन येथील एजिस बाउल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या अंतिम सामन्यापुर्वी भारतीय संघाला सराव सामने खेळता आले नाहीत. परंतु याची कमतरता खेळाडूंनी इंट्रा-स्क्वाड सामन्यात पूर्ण करून घेतली. तेच दुसरीकडे न्यूझीलंड संघाने इंग्लंडविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळली आहे.
विराटने पत्रकार परिषदेत सांगितले की, “आम्ही आक्रमक क्रिकेट खेळीच्या जोरावरच हा सामना जिंकू शकतो. कोणत्याही संघातील खेळाडू वाईट नाहीत आणि आम्ही या गोष्टीचा अधिक विचार करत नाही. आम्हाला माहिती आहे की, न्यूझीलंड संघ आमच्या विरुद्ध आहे. आम्ही मैदानावर अशीच खेळी करू ज्यासाठी आम्ही ओळखले जातो. मैदानाबाहेर आम्ही वेगळे आहोत. परंतु मैदानाच्या आत एक वेगळी भावना असते. हा खूप मोठा सामना आहे आणि हा सामना कमी आक्रमतेने खेळता येणार नाही.”
विराट इंग्लंडमधील हवामानाच्या परिस्थितीवर आणि सराव सामन्याबद्दलही बोलला. विराट म्हणाला की, “साऊथम्प्टनमध्ये हवामानात लवकर बदल होतात. सरावादरम्यान हवामान गरम होते. आता थंडी आहे. परंतु हवामानानुसार काहीही बदललेले जाणार नाही. आम्ही सर्वात बळकट संघासह मैदानात उतरू. आम्ही हवामानावर लक्ष देत नाही. आम्ही फक्त मूळ गोष्टींवर लक्ष देणार आहोत. हवामानामुळे संघात कोणताही बदल होणार नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात ‘हे’ भारतीय शिलेदार बलाढ्य न्यूझीलंडचा उडवतील धुव्वा!
दुर्दैवच म्हणावे! WTC फायनलमध्ये ‘हा’ अंपायर भारतासाठी अनलकी, यापुर्वी ४ विश्वचषकात नडलाय
पुजाराच्या संथ फलंदाजीवर टिका करणाऱ्यांना दिनेश कार्तिकची सणसणीत चपराक, पाहा काय म्हणाला






