आयपीएल 2023चा 20वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. लखनऊ सुपर जायंट्सकडून एका विकेटने मिळालेल्या पराभवानंतर आरसीबी पुन्हा विजयाच्या मार्गावर येण्यासाठी या सामन्यात खेळत आहे. शनिवारी (15 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आपल्या होम ग्राउंडवर खेळताना आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली याने अर्धशतक केले.
शनिवारी बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि दिल्ली संघ आमने सामने आले. दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर () याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. दुसरीकडे नाणेफेक गमावल्यानंतर आरसीबीला प्रथम फलंदाजी करावी लागली. असे असले तरी, सलामीला आलेला विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी संघाला वादळी सुरुवात मिळवून दिली. विराटने 50, तर डू प्लेसिसने 22 धावांची महत्वपूर्ण योगदान दिले. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये 28 चेंडू 42 धावांची भागीदारी देखील पार पडली.
आयपीएल 2023 मध्ये आरसीबी शनिवारी आपला चौथा सामना खेळण्यासाठी मैदानात आली. या चार सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये विराट कोहलीने संघासाठी वरच्या फळीत येऊन अर्धशतके केली आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्ध हंगामातील पहिल्या सामन्यात विराट कोहलीने नाबाद 82* धावा कुटल्या होत्या. त्यानंतर केकेआरविरुद्ध त्याने 21 धावांवर विकेट गमावली. पण लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध त्याने 61 धावा कुटल्या होत्या. हंगामाती आपले तिसरे अर्धशतक विराटने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ठोकले. यासाठी त्याला एकूण 33 चेंडू खेळावे लागले. मात्र डावातील 34व्या चेंडूवर ललित यादवने विराटला यश धूलच्या हातात झेलबाद केले. (Virat Kohli scored a half-century in the third of four matches of IPL 2023)
आयपीएल 2023मध्ये विराट कोहलीची आकडेवारी
– 82*(49) विरुद्ध मुंबई इंडियन्स
– 21(18) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
– 61(44) विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
– 50(34) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर बुमराह-श्रेयसच्या दुखापतीवर बीसीसीआयने दिले अपडेट, अशी आहे पुढील रणनीती
RCB vs DC । दिल्ली कॅपिटल्सने जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा निर्णय, ‘अशी’ आहे प्लेइंग इलेव्हन