---Advertisement---

एकदमच टॉपला! सध्या खेळत असलेल्या खेळाडूंत कोणीही नाही विराटच्या आसपास; पाहा ही आकडेवारी

On: रविवार, जानेवारी 15, 2023 5:33 PM
Virat-Kohli-Record
---Advertisement---

रविवारी (दि. 15 जानेवारी) तिरुवनंतपुरम येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा खेळला गेला. विशेष म्हणजे, मालिकेतील पहिले दोन वनडे सामने जिंकत भारत तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेला क्लीप देण्यासाठी उतरला होता. या सामन्यात भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याच्या बॅटमधून आणखी एक शतक आले. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 74 वे शतक ठरले.‌ याबरोबरच तो सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज म्हणून बराच पुढे गेला आहे.

विराट कोहली (Virat Kohli) मागच्या वर्षी खेळल्या गेलेल्या आशिया चषकापासून त्याच्या जुन्या लयीत परतल्याचे चाहत्यांना दिसत आहे. श्रीलंकेविरुद्ध मंगळवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात देखील त्याने वादळी शतक ठोकले. त्यानंतर या सामन्यात त्याने शतक ठोकत ही संख्या 74 पर्यंत नेली. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 110 चेंडूंवर 166 धावा केल्या. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त 100 शतके केली आहेत. विराट सध्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रिकी पाँटिंग याच्या 70 आंतराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडीत काढला आहे. मागच्या चार वनडे डावांमध्ये विराट कोहलीने केलेले हे तिसरे शतक आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट सर्वाधिक शतके करणारा फलंदाज आहे. यादीतील दुसऱ्या क्रमांकाच्या फलंदाज आणि विराट यांच्यातील शतकांची तफावत मोठी आहे. यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेविड वॉर्नर आहे. वॉर्नरच्या नावावर आतापर्यंत 45 आंतराष्ट्रीय शतके केली आहेत. इंग्लंडचा जो रूट 44 शतकांसह तिसऱ्या स्थानी आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय खेळाडूमध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज 
विराट कोहली – 73
डेव्हिड वॉर्नर – 45
जो रूट – 44
स्टीव स्मिथ – 42
रोहित शर्मा – 41

(Virat Kohli scored his 74th international century in Current Cricketers)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
षटकार किंग हिटमॅनच! श्रीलंकेविरुद्ध पहिला सिक्सर मारताच धोनीला ‘या’ यादीत टाकले मागे
पंजाबचा वाघ ऑस्ट्रेलियात चमकला! विक्रम रचूनही कुणालाच लागला नाही पत्त्या, जाणून घ्याच

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---