भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने काल झालेल्या (21 ऑक्टोबर) विंडीज विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात 2018 वर्षात 2000 आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा गाठला आहे. अशी कामगिरी त्याने पाच वेळा केली आहे.
याचबरोबर विराट या वर्षात 2000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
विराटची आंतरराष्ट्रीय 2000 धावा पूर्ण करण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. याआधी त्याने 2012, 2014, 2016 आणि 2017 मध्ये अशी कामगिरी केली आहे.
यावेळी विराटने वनडेतील 36वे साजरे केले. तसेच सलग तीन वर्षात आतंरराष्ट्रीय 2000 धावा करणारा तो चौथाच फंलदाज ठरला आहे.
याआधी पहिल्यांदा सचिन तेंडूलकरने 1996-98मध्ये अशी कामगिरी केली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज फलंदाज मॅथ्यू हेडन (2002-04) आणि इंग्लंडच्या जो रूटनेही 2015-17 या सलग तीन वर्षात 2000पूर्ण धावा करण्याचा पराक्रम केला आहे.
On fire! India skipper @imVkohli has his 49th half-century in ODIs, and has become the first player to score 2,000 international runs in 2018! 🙌 #INDvWI LIVE ➡️ https://t.co/IT7uA5nimO pic.twitter.com/avlvPgpKzR
— ICC (@ICC) October 21, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट की धोनी? कोण करणार वन-डेत १० हजार धावा आधी
–रोहित हिटमॅन शर्माने केला क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम; गांगुली, सचिनलाही टाकले मागे