विराट कोहलीने Virat Kohli) आपल्या एकदिवसीय (ODI) कारकिर्दीतील 54 वे शतक झळकावले आहे. इंदोरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ही कामगिरी केली. अवघ्या 91 चेंडूंमध्ये त्याने आपले शतक पूर्ण केले, ज्यामध्ये त्याने 8 चौकार आणि 2 षटकार लगावले. या शतकासह विराट आता एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. याबाबतीत त्याने रिकी पाँटिंगचा (Ricky ponting) विक्रम उद्ध्वस्त केला आहे.
विराट कोहली आता न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकणारा क्रिकेटर ठरला आहे. किवी संघाविरुद्धचे हे त्याचे 7 वे शतक होते. याआधी रिकी पाँटिंग आणि वीरेंद्र सहवाग (Virendra sehwag) यांनी न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी 6-6 शतके झळकावली होती, परंतु विराट आता या सर्वांच्या पुढे गेला आहे.
न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतके:
विराट कोहली: 7 शतके
रिकी पाँटिंग: 6 शतके
वीरेंद्र सहवाग: 6 शतके
त्याचबरोबर विराट कोहलीने रिकी पाँटिंगला मागे टाकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याचा जागतिक विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे.






