भारताचा क्रिकेट कर्णधार आणि स्टायलिश खेळाडू विराट कोहलीने एक नवा विक्रम केला आहे. हा विक्रम क्रिकेटमधील नसून स्पीड कार चालवण्याचा आहे. आयसीसी ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ १ जूनपासून सुरु होत आहे. आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ तिकडे रावण होणार आहे. कोहलीची बेंगलोर टीम आधीच स्पर्धेच्या बाहेर पडल्यामुळे तो जीवांचा आनंद लुटत आहे. त्यात काळ त्याने ग्रेटर नोएडा येथील ‘बुद्ध इंटरनॅशनल सर्किट’वर स्पीड कार चालवण्याचा मनमुराद आनंद लुटला आहे.
यावेळी ‘ऑडी ८ स्पोर्ट्स कार’ चालवताना ‘बुद्ध इंटरनॅशनल सर्किट’वर तब्बल २८० किमी प्रतितास वेगाने गाडी चालवली. विराटने यापूर्वीही २९० किमी प्रतितास वेगाने गाडी चालवली आहे. परंतु हा अनुभव वेगळा होता. ‘मी यापूर्वी ताशी २९० किमीच्या वेगानेही कार चालवली आहे. खरंतर त्यावेळी मी फार घाबरलो होतो. कारण, ज्या प्रमाणे प्रोफेशलन ड्रायव्हर्स कारवर शेवटच्या क्षणी नियंत्रण ठेवतात तसं काही मला जमलं नव्हतं’, असं विराट ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना म्हणाला.
यावेळी त्याने क्रिकेटशी निगडित प्रश्नांना उत्तरे देणं टाळलं. त्याला आयपीएलमधील आठवणी विसरायच्या आहेत . विराट सध्या मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला, ” मी दिल्ली मध्ये वाढलो आहे. मी इथे खेळलो आहे. माझे कुटुंब येथे राहतं. माझ्या खूप आठवणी दिल्लीशी निगडित आहेत. म्हणून मी अश्या जागी जात असतो जेथे मी बालपण घालवाल आहे तसेच आधी क्रिकेटचं प्रशिक्षण घेतलं आहे. ”
भारताची ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ मधील पहिला सामना पारंपरीक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी ४ जूनला आहे.