एशिया कप (Asia Cup) २०२२ या स्पर्धेसाठी भारताचा १५ जणांचा संघ जाहीर झाला. ही स्पर्धा दुबईमध्ये खेळली जाणार आहे. यातील भारताचा पहिला सामना २८ ऑगस्टला पाकिस्तान (INDvsPAK)विरुद्ध आहे. या स्पर्धेतून भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली संघात परतला आहे. आऊट ऑफ फॉर्म असणाऱ्या विराटसाठी पाकिस्तान विरुद्ध एक विश्वविक्रम करण्याची संधी आहे.
भारताचा तिसऱ्या क्रमांकावरील विश्वासाचा फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याची बॅट मागील काही काळापासून शांत आहे. इंग्लंड दौऱ्यातही तो विशेष कामगिरी करू शकला नाही. यामुळे त्याच्यावर सतत टिका होत आहे. अशातच त्याने एशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध मैदानात उतरताच क्रिकेटविश्वात ती खास कामगिरी करणारा दुसराच तर पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे.
१००वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळणार विराट कोहली
विराटने भारताकडून आतापर्यंत ९९ टी२० सामने खेळले आहेत. पाकिस्तान विरुद्ध होणारा सामना त्याचा १००वा टी२० सामना असणार आहे. भारताकडून १०० टी२० सामने खेळणारा विराट दुसरा पुरूष खेळाडू ठरणार आहे. कर्णधार रोहित शर्मा याने १३२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. तसेच महिला क्रिकेटमध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. तिने १२९ सामने खेळले आहेत. आता या यादीत विराटचा समावेश होणार आहे.
हा विक्रम करणारा पहिलाच भारतीय
विराट क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये १०० पेक्षा अधिक सामने खेळणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरणार आहे. त्याने भारताकडून १०२ कसोटी आणि २६२ वनडे सामने खेळले आहेत. त्याने २००८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तसेच भारतासाठी त्याने २०१०मध्ये पहिला टी२० आणि २०११मध्ये पहिला कसोटी सामना खेळला आहे. क्रिकेटविश्वात न्यूझीलंडच्या रॉस टेलरने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात १०० पेक्षा अधिक सामने खेळले आहेत.
विराटला फॉर्ममध्ये येणे जरूरी
भारतीय संघासाठी विराटला फॉर्ममध्ये परतणे गरजेचे आहे. एशिया कपमध्ये पाकिस्तान संघ भारताला चांगली टक्कर देऊ शकतो. पाकिस्तान विरुद्ध त्याची सरासरी दुसऱ्या क्रमांकाची उत्तम आहे. त्याने पाकिस्तान विरुद्ध ७ टी२० सामने खेळताना ७७.७५च्या सरासरीने ३११ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याची टी२०मधील ऑस्ट्रेलियामध्ये ६४.४२ सरासरी आहे. त्याने ११ सामन्यात ४५१ धावा केल्या आहेत. त्यात ५ अर्धशतकांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय टी२० बरोबरच त्याच्या ७१व्या शतकाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याने २०१९नंतर एकही आंतरराष्ट्रीय शतक केले नाही. त्याचबरोबर यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इन्ज्यूरी, कोरोना अन् पुनरागमन! केएल राहुल तब्बल ९ महिन्यानंतर दिसणार मैदानावर
राज्य ज्यूदो स्पर्धा २०२२: विकास, संपदा, गौतमी, समीक्षा, अपूर्वा, साईप्रसाद यांनी पटकावले सुवर्ण
‘शमी टी-२० विश्वचषकाचा भाग नक्की असेल’, भारताच्या माजी यष्टीरक्षकाचे भाकित