भारताचा कर्णधार विराट कोहली नेहमीच मैदानावर करत असलेल्या वेगवेगळ्या विक्रमांमुळे चर्चेत असतो. त्याच्या अशाच खेळामुळे त्याला मागील दोन दिवसांपासुन गोड बातम्या मिळत आहेत.
आजच बीसीसीआयचे दोन वर्षांचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात कर्णधार विराटला 2016-17 आणि 2017-18 या दोन मोसमासाठी सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटूचा प्रतिष्ठित पॉली उम्रीगर पुरस्कार जाहिर झाला आहे.
या दोन्ही मोसमाच्या पुरस्कारासाठी त्याला प्रत्येकी 15 लाख रूपये आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.
कालच विराटचे नाव ‘World’s Highest Paid Athletes 2018’फोर्ब्सच्या यादीतही आले आहे. तो सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेट खेळाडू ठरला आहे. याबरोबरच कालच त्याच्या मादाम तुसादमधील मेणाच्या पुतळ्याचेही अनावरण दिल्लीत झाले.