भारतीय संघातील दिग्गज फलंदाज विराट कोहली याने (Virat Kohli) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेनंतर कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले होते. या निर्णयानंतर सर्वांना आश्चर्य वाटले होते. तसेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले होते. तर आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा (ICC T20 world cup) झाल्यानंतर त्याने टी२० संघाचे कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा केली होती. आता वनडे आणि टी२० संघाचे नेतृत्वपद रोहित शर्मा याच्या (Rohit Sharma) हाती सोपवण्यात आले आहे. दरम्यान, आता विराट कोहलीने याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
विराट कोहलीने ‘फायरसाईड विद विके’ वर म्हटले की, “प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. तुम्हाला त्याची जाणीव असणं गरजेचं आहे. असं होऊ शकतं की, एखादा व्यक्ती म्हणेल की, काय केलस? परंतु, तुम्हाला माहीत असतं की, एक शिखर गाठल्यानंतर तुम्ही तुमचं काम केलं आहे. आता एक फलंदाज म्हणून संघात करण्यासाठी अनेक गोष्टी असतील. आता फलंदाज म्हणून संघासाठी जास्त सामने जिंकून देऊ शकतो.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “तुम्हाला एक लीडर होण्यासाठी कर्णधार असण्याची आवश्यकता नसते. जेव्हा एमएस धोनी (Ms Dhoni) संघात होता, त्यावेळी असे नव्हते की, तो लीडर नव्हता. तो एक व्यक्ती होता, त्याच्याकडून आम्हाला मार्गदर्शन सातत्याने मिळत राहायचं.”
अधिक वाचा – विराट कोहली नव्हे, तर ‘हे’ आहेत भारताचे सर्वोत्तम कर्णधार, माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य
“पुढे जाण्याचा निर्णय घेणं देखील लीडरशीपचा एक भाग आहे. हे समजण्यासाठी वेगवेगळ्या परिस्थितीची आवश्यकता असते. तुम्हाला योग्यवेळी योग्य लोकांना पुढे आणण्याची गरज आहे. कुठल्याही व्यक्तीने सर्व प्रकारची जबाबदारी पार पाडण्यासाठी तयार असायला हवं. मी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली एक खेळाडू म्हणून बरेच वर्ष खेळलो आहे. तसेच गेली अनेक वर्ष मी या संघाचा कर्णधार राहिलो आहे. पण माझा दृष्टिकोन आणि विचार तसाच राहिला. मी खेळाडू असतानाही कर्णधारासारखाच विचार करायचो. मला संघाला विजय मिळवून द्यायचा होता.”
विराट आता ६ फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु होणाऱ्या वनडे मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली खेळताना दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
कडक! फुल टॉस चेंडूवर राशिदने खेचला ‘नो लूक’ षटकार, व्हिडिओ पाहा
“‘माझी धोनीबद्दल नाही, तर बीसीसीआयबद्दल तक्रार आहे”
इंग्लंडसाठी १४२ सामने खेळलेल्या वेगवान गोलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती