---Advertisement---

वामिकाला भविष्यात आईसारखं मजबूत बनलेलं पाहायचंय; महिला दिनी कोहलीचा लेकीला खास संदेश

On: सोमवार, मार्च 8, 2021 12:47 PM
Vira-Kohli-Anushka-And-Vamika
---Advertisement---

आजचा दिवस (८ मार्च) जगातील प्रत्येक महिलेच्या दृष्टीने अतिशय विशेष आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात हा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भारतीय क्रिकेच संघाचा कर्णधार विराट कोहली याने आपली पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने आपल्या लाडक्या मुलीसाठी मोलाचा संदेशही लिहिला आहे.

विराटसाठी अनुष्का ही त्याच्या आयुष्यातील सर्वात कणखर महिला आहे. त्याला आपल्या मुलीलाही भविष्यात अनुष्कासारखेच बनवायचे आहे.

विराटने अनुष्काने वामिकाला कुशीत घेतले असतानाचा सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘लहान बाळाला जन्मताना पाहणे सोपी गोष्ट नसते. हा कोणत्याही व्यक्तिसाठी अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक अनुभव असतो. जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीला वास्तवात तिच्या बाळाला जन्म देताना पाहता; तेव्हा तुम्हाला तिच्या खऱ्या ताकदीची आणि दिव्यतेची समज येते. तुम्हाला कळते की, का ईश्वराने तिच्यामध्ये एका नव्या जिवाची निर्मिती केली असावी. असे यामुळे की, एक स्त्री आपणा सर्वांच्या तुलनेत खूप मजबूत असते.’

‘माझ्या आयुष्यात सर्वात मजबूत आणि कोमल हृद्य असणाऱ्या स्त्रीला अर्थात अनुष्काला महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. सोबतच तिलाही शुभेच्छा जी पुढे जाऊन अगदी तिच्या आईसारखी बनणार आहे. याबरोबरच जगातील सर्व अद्भुत स्त्रीयांना महिला दिनाच्या शुभेच्छा,’ असे विराटने शेवटी लिहिले आहे.

https://www.instagram.com/p/CMJZFGpF-E0/?utm_source=ig_web_button_share_sheet

विराट कोहली सध्या टी२० मालिकेच्या तयारीत व्यस्त

विराट सध्या भारतीय संघासोबत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका ३-१ ने जिंकल्यानंतर त्यांचे लक्ष्य आता येती टी२० मालिका जिंकण्यावर आहे. १२ मार्च पासून ५ सामन्यांच्या टी२० मालिकेची सुरुवात होणार आहे. तर २० मार्च रोजी या मालिकेचा अंतिम सामना होईल. हे सर्व सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येतील.

महत्त्वाच्या बातम्या-

गुरुजींनी थेट आयसीसीवर साधला निशाणा; म्हणाले, “सतत नियमांमध्ये बदल करणे टाळा”

भाग्यवंत विराट कोहली; क्रिकेटविश्वातील ‘हा’ मानाचा विक्रम करणारा एकमात्र खेळाडू

आयपीएल २०२१: ‘ऑरेंज आर्मी’ची पहिली भिडंत केकेआरविरुद्ध, पाहा त्यांचे संपूर्ण वेळापत्रक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---